TRENDING:

Recipe Video: रोजच्या वटाण्याच्या भाजीला कंटाळला? घरच्या घरीच बनवा हॉटेलसारखा मटार खिमा

Last Updated:

सध्या बाजारात हिरव्या वटाण्याची रेलचेल पाहायला मिळते आहे. रोज रोज वटाण्याची भाजी किंवा आमटी खायचा कंटाळा आला असेल तर घरच्या घरी हॉटेलसारखा मटार खिमा एकदा नक्कीच ट्राय करून पाहा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सध्या बाजारात ताज्या हिरव्या वाटाण्याची रेलचेल पाहायला मिळते आहे. वटाण्याची भाजी आणि आमटी उसळ हे पदार्थ सध्या घरी मोठ्या प्रमाणावर बनवले जात आहेत. पण रोज रोज तेच पदार्थ खाऊन घरातल्या सगळ्यांनाच कंटाळा येतो. विशेषतः लहान मुलांना वाटाण्याची भाजी फारशी आवडत नाही, पण त्याच वाटाण्यापासून जर मटार खिमा हा पदार्थ बनवला तर मात्र सगळेच खुश होतील. तर आज आपण पाहणार आहोत कमी साहित्य वापरून झटपट तयार होणारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेन असा मटार खिमा.
advertisement

साहित्य:

  • 1 कप हिरवे मटार
  • 2 मध्यम कांदे (बारीक चिरलेले)
  • 2 टोमॅटो (चिरलेले/प्युरी)
  • 1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • 1/2 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून गरम मसाला
  • मीठ चवीनुसार
  • तेल 2–3 टेबलस्पून
  • कोथिंबीर सजावटीसाठी
  • मेथी थोडीशी बारीक चिरलेली

कृती:

  1. कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका मग कांदा टाका कांदे सोनेरी होईपर्यंत परता.
  2. advertisement

  3. मग टोमेटो आणि आलं-लसूण पेस्ट घालून घ्या.
  4. त्यानंतर व्यवस्थित परतून घ्या आणि त्यात मसाले घालून मिश्रण 2 मिनिटे शिजवा.
  5. मग मटा, मेथी, कोथिंबीर घालून झाकण ठेवून मंद आचेवर 10–15 मिनिटे शिजवा.
  6. शेवटी कोथिंबीर टाकून सर्व्ह करा!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनचे दर वाढले, कापूस आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

गरमागरम मटार खिमा पोळी, भाकरी किंवा पावासोबत दिल्यास जेवणाची चव नक्कीच वाढते.त्यामुळे मटार खिमा नक्की ट्राय करा.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Recipe Video: रोजच्या वटाण्याच्या भाजीला कंटाळला? घरच्या घरीच बनवा हॉटेलसारखा मटार खिमा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल