परफेक्ट उकडलेली अंडी कशी तयार करावीत?
अशी अंडी उकडताना लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. BBC च्या एका अहवालानुसार, अंड्याचे दोन भाग - पांढरट भाग (अल्ब्युमिन) आणि पिवळा भाग (योल्क) वेगवेगळ्या तापमानावर शिजतात. अल्ब्युमिनला ८५ अंश सेल्सियस तापमानाची आवश्यकता असते, तर योल्कला ६५ अंश सेल्सियस तापमान आवश्यक आहे. जेव्हा आपण अंडी 100 अंश सेल्सियस तापमानावर उकडतो, तेव्हा पांढरट भाग व्यवस्थित शिजतो, पण पिवळा भाग जास्त तापमानामुळे कठीण होतो. दुसरीकडे, कमी तापमान ठेवल्यास, पांढरट भाग अर्धवट उकडलेला राहतो.
advertisement
शास्त्रज्ञांची नवीन पद्धत
इटलीच्या राष्ट्रीय संशोधन मंडळाने एक खास पद्धत विकसित केली आहे, ज्याला 'पीरियोडिक कुकिंग' म्हटले जात आहे. या पद्धतीमध्ये अंडी वेगवेगळ्या तापमानांच्या पाण्यात पुन्हा पुन्हा टाकली जातात, ज्यामुळे अंड्याला योग्य टेक्सचर आणि चव मिळते.
अंड्याला उकडण्याची नवीन पद्धत
तुम्हाला परफेक्ट अंडी उकडायची असतील, तर प्रथम अंडे 100 अंश सेल्सियस तापमानाच्या उकडलेल्या पाण्यात ठेवा. दोन मिनिटे उकडल्यानंतर, अंडे बाहेर काढा आणि 30 अंश सेल्सियस तापमानाच्या गार पाण्यात ठेवा. ही प्रक्रिया 32 मिनिटांसाठी पुन्हा पुन्हा करावी लागेल. प्रत्येक 2 मिनिटांनी अंडे गरम आणि गार पाण्यात बदलावे लागतील. यामुळे अंड्याचा पिवळा भाग मऊ आणि क्रीमी राहील. आणि अंड्याचा पांढरट भाग परफेक्ट उकडलेला राहील, पण कठीण होणार नाही. यामुळे अंड्याचे पोषणही जतन होईल आणि चवही सुधारेल.
पण, ही पद्धत प्रत्येकासाठी सोपी आहे का?
उत्तर : ही पद्धत थोडी वेळ घेणारी आहे आणि जी लोक अंडे उकडून ठेवतात किंवा लगेच खातात, त्यांच्यासाठी ही पद्धत योग्य नाही. पण जर तुम्हाला परफेक्ट उकडलेली अंडी हवी असतील, तर ही पद्धत वापरून तुम्ही सर्वोत्तम चव आणि पोषकतत्वांचा लाभ घेऊ शकता.
हे ही वाचा : किचनमधील ही वस्तू 'थायराॅईड' करते बरा, फक्त रोज सकाळी करा हे काम, हाॅर्मोन्सही राहतात संतुलित
हे ही वाचा : Bitter Gourd: चुकूनही या 5 वस्तू कारल्यासोबत नका खाऊ, शरीरात तयार करतात विष, पोटदुखीचा होतो भयंकर त्रास