Bitter Gourd: चुकूनही या 5 वस्तू कारल्यासोबत नका खाऊ, शरीरात तयार करतात विष, पोटदुखीचा होतो भयंकर त्रास

Last Updated:

Bitter Gourd: कारले आरोग्यदायी असले तरी काही पदार्थांसोबत ते खाणे हानिकारक ठरू शकते. आंबा, केळी यांसारखी गोड फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मध, दालचिनी... यांसारखे मसाले आणि टोमॅटोसारखे आंबट पदार्थ कारल्यासोबत खाऊ नये.

News18
News18
बहुतेक लोकांना कारले खायला आवडत नाही, कारण त्याची चव अतिशय कडू असते. पण कारल्याचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते आणि शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. विशेषतः मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी कारले रामबाण उपाय आहे, कारण ते रक्तातील साखरेची पातळी वाढू देत नाही.
तुम्ही कारल्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतींनी बनवू शकता, पण काही पदार्थांसोबत ते खाणे टाळावे. कारण त्यातील पोषकतत्त्वे आणि चव काही घटकांसोबत प्रतिक्रिया देऊन शरीरावर विपरीत परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊया, कोणत्या पदार्थांसोबत कारले खाणे टाळावे.

गोड फळांसोबत कारले खाऊ नका

कारले खाल्ल्यावर गोड फळे जसे की आंबा, केळी यांचे सेवन करू नये. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, कारल्याची कडू चव आणि गोड फळांची चव एकत्र आल्याने केवळ अन्नाचा स्वाद खराब होत नाही, तर पचनसंस्थेवरही वाईट परिणाम होतो.
advertisement

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून दूर राहा

दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांसोबत कारल्याचे सेवन करू नये. कारल्याची भाजी किंवा रस घेत असताना दूध घेतल्यास त्याची चव, रंग आणि पोत बदलतो. तसेच, दुधासोबत कारले खाल्ल्यास शरीरात घातक प्रतिक्रिया होऊ शकतात आणि अन्नाचे पोषणमूल्यही कमी होते.

मधासोबत कारले घेऊ नका

काही लोक कारल्याची कडू चव कमी करण्यासाठी त्यात मध मिसळतात, पण हे चुकीचे आहे. मध आणि कारल्याचे मिश्रण शरीरात विषारी घटक तयार करू शकते, त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कारल्याचे पदार्थ बनवताना त्यात मध टाकणे टाळा.
advertisement

संपूर्ण मसाले (खडे मसाले) वापरू नका

कारल्याची चव आधीच कडसर असते, त्यामुळे त्यात जास्त तिखट किंवा खडे मसाले टाकू नयेत. दालचिनी, काळी मिरी, जायफळ आणि लवंग यांसारखे संपूर्ण मसाले कारल्यासोबत वापरल्यास त्याची चव अधिक उग्र आणि अति कडू होते, ज्यामुळे ते खाण्यायोग्य राहात नाही.

आम्लयुक्त (आंबट) पदार्थांपासून दूर रहा

कारल्याची कडू चव अधिक तीव्र होऊ नये यासाठी जास्त आम्लयुक्त (ॲसिडिक) पदार्थांपासून दूर राहा. उदा. टोमॅटो, लिंबू, संत्री यांसारखे पदार्थ कारल्यासोबत खाल्ल्यास त्याच्या कडूपणात वाढ होते. त्यामुळे चव खराब होते आणि अन्न पचनास त्रास होऊ शकतो.
advertisement
कारले हे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, योग्य प्रकारे सेवन करणे महत्त्वाचे आहे. गोड फळे, दूध, मध, संपूर्ण मसाले आणि आंबट पदार्थ यांसोबत कारल्याचे सेवन टाळल्यास त्याचे पोषणमूल्य आणि आरोग्यदायी फायदे कायम राहतात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Bitter Gourd: चुकूनही या 5 वस्तू कारल्यासोबत नका खाऊ, शरीरात तयार करतात विष, पोटदुखीचा होतो भयंकर त्रास
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement