TRENDING:

Kitchen : मसाले नेहमी ओले का होतात? गृहिणींना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळेल, उपाय काय? तेही जाणून घ्या

Last Updated:

डब्यात ठेवलेला मसाला काही दिवसांनी सुका न राहता त्याचे गोळे होतात, त्याला बुरशी लागते किंवा त्याचा मूळ सुवास निघून जातो. मसाले ओले झाले की त्याची चव तर बिघडतेच एवढंच नाही तर ते आरोग्यासाठीही घातक ठरू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : स्वयंपाकघरात शिरल्यावर जो मसाल्यांचा खमंग सुवास येतो, तोच खऱ्या अर्थाने आपल्या जेवणाची भूक वाढवतो. हळद, तिखट, जिरेपूड किंवा गरम मसाला... हे मसाले म्हणजे भारतीय गृहिणींचा खरा खजिना. पण अनेकदा एक समस्या आपल्याला छळते, ती म्हणजे मसाल्यांना येणारा 'ओलावा'. डब्यात ठेवलेला मसाला काही दिवसांनी सुका न राहता त्याचे गोळे होतात, त्याला बुरशी लागते किंवा त्याचा मूळ सुवास निघून जातो. मसाले ओले झाले की त्याची चव तर बिघडतेच एवढंच नाही तर ते आरोग्यासाठीही घातक ठरू शकतात.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

असं का होतं? मसाला खराब होण्यामागे केवळ वातावरण नाही, तर आपल्या काही छोट्या चुकाही कारणीभूत असतात. चला तर मग, मसाले ओले का होतात आणि ते वर्षभर कडक आणि सुवासिक कसे ठेवायचे, याच्या काही खास टिप्स जाणून घेऊया.

मसाल्यांना ओलावा का येतो? आणि तो रोखण्यासाठी 'या' 5 रामबाण टिप्स

मसाले टिकवण्यासाठी त्यांना ओलाव्यापासून वाचवणं हाच एकमेव मंत्र आहे. खालील गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचे मसाले कधीच खराब होणार नाहीत

advertisement

1. फोडणी देताना वाफेचा संपर्क

आपल्यापैकी बहुतेक जण गॅसवर कढई तापलेली असतानाच मसाल्याचा डबा जवळ नेतात आणि त्यातून चमच्याने मसाला टाकतात. कढईतून निघणारी वाफ थेट मसाल्याच्या डब्यात शिरते. ही वाफ डब्यात गेल्यावर तिचे पाणी होते आणि मसाले ओले होऊन त्यांचे गोळे बनतात.

काय कराल? मसाल्याचा डबा गॅसपासून लांब ठेवा. हवा तितका मसाला एका वाटीत काढून घ्या आणि मगच तो फोडणीत टाका.

advertisement

2. ओला चमचा वापरणे

घाईघाईत आपण भाजी ढवळतो आणि त्याच ओल्या चमच्याने मसाल्याच्या डब्यातून तिखट किंवा हळद काढतो. चमच्याला लागलेला पाण्याचा अंश मसाल्यात जातो आणि तिथूनच बुरशीची सुरुवात होते.

काय कराल? मसाल्याच्या डब्यात नेहमी एक छोटा कोरडा चमचा कायमस्वरूपी ठेवा आणि तोच वापरा.

3. प्लास्टिकचे डबे टाळा

प्लास्टिकच्या डब्यांमध्ये हवा लवकर शिरते आणि ते तापमानानुसार आतून ओलावा धरतात. यामुळे मसाल्यांचा सुवासही उडून जातो.

advertisement

काय कराल? मसाले साठवण्यासाठी नेहमी काचेच्या बरण्या किंवा चिनी मातीच्या बरण्यांचा वापर करा. काच मसाल्यांचा नैसर्गिक सुवास आणि कोरडेपणा टिकवून ठेवते.

4. हिंगाचा खडा किंवा लवंग वापरून पहा

जर तुम्हाला मसाले वर्षभर टिकवायचे असतील, तर जुन्या काळातील एक ट्रिक खूप कामाची आहे.

काय कराल? लाल तिखट किंवा गरम मसाल्याच्या डब्यात एक हिंगाचा छोटा खडा किंवा 2-3 लवंगा टाकून ठेवा. यामुळे मसाल्यांना ओलावा लागत नाही आणि कीडही लागत नाही.

advertisement

5. मिठाचा वापर

जर तुम्ही घरी मसाला बनवत असाल किंवा विकतचा मसाला मोठ्या डब्यात भरत असाल, तर त्यात थोडं मीठ मिसळा. मीठ हवेतील ओलावा शोषून घेतं आणि मसाल्यांना सुकं ठेवतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krishi Market: शेतकरी मालामाल होणार, शेवगा बाजारात तेजी; आले, गुळाचे भाव काय?
सर्व पहा

पावसाळ्यात हवेत खूप आर्द्रता असते. अशा वेळी मसाले खराब होऊ नयेत म्हणून ते फ्रिजच्या दारात किंवा थंड जागी ठेवावेत. फ्रिजमध्ये मसाले ठेवताना डबा पूर्णपणे 'एअरटाईट' असल्याची खात्री करा, अन्यथा फ्रिजचा वास मसाल्यांना येऊ शकतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Kitchen : मसाले नेहमी ओले का होतात? गृहिणींना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळेल, उपाय काय? तेही जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल