थंडी वाढत असताना, गुडघ्यांना गंज लागल्यासारखं वाटतं, ज्यामुळे बसणं, उभं राहणं किंवा चालणं कठीण होतं. डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात गुडघेदुखी केवळ थंडीमुळे होत नाही तर शरीरातील इतर अनेक बदलांमुळे होते. हिवाळ्यात बॅरोमेट्रिक प्रेशर (BA) कमी होतं. जाणून घेऊया यामुळे नक्की काय होतं.
Tomato Benefits : आहा..टमाटर..बडे मजेदार..पाहूयात टॉमेटॉचे आरोग्यदायी फायदे
advertisement
हिवाळ्यात बॅरोमेट्रिक प्रेशर (BA) कमी होतं, यामुळे सांध्याभोवती असलेल्या ऊतींमध्ये सूज वाढू शकते, ज्यामुळे वेदना आणि कडकपणा येतो. थंडीमुळे रक्ताभिसरण देखील मंदावतं. गुडघ्यांमधील सायनोव्हियल द्रवपदार्थ, जो सांध्याला वंगण घालतो, थंडीत जाड होतो. परिणामी सांध्यांची हालचाल कमी होते आणि वेदना वाढतात. शिवाय, हिवाळ्यात सूर्यप्रकाशाचा अभाव व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण करू शकतो, ज्यामुळे हाडं आणि सांधे कमकुवत होतात.
आयुर्वेदाप्रमाणे, हे वात दोषाच्या तीव्रतेचं कारण आहे. आयुर्वेदानुसार, थंड आणि कोरडं हवामान वात दोष वाढवतं, ज्यामुळे सांध्यात कोरडेपणा, वेदना जाणवतात आणि कडकपणा येतो. शरीरातील श्लेषक कफ, जो नैसर्गिकरित्या सांध्यांना वंगण घालतो, तो वात वाढल्यामुळे सुकू लागतो. म्हणूनच हिवाळ्यात गुडघ्यांच्या समस्या जास्त आढळतात.
आयुर्वेदिक उपचार आणि घरगुती उपचारांमुळे या वेदना कमी होऊ शकतात. सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे तेल मालिश. तीळ तेल किंवा महानारायण तेलानं दररोज गुडघ्यांना हलक्या हातानं मालिश केल्यानं सांध्यांमधे उब जाणवते आणि कडकपणा कमी होतो.
Guava : हिवाळ्यात पेरु का खावा ? वाचा आरोग्यदायी फळाचे भरपूर फायदे
सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मेथीचे दाणे खाणं देखील फायदेशीर मानलं जातं, कारण मेथीची मूळ प्रकृती उष्ण आहे आणि यामुळे सूज कमी करण्यास मदत होते. हळद आणि आल्याचा काढा प्यायल्यानं अंतर्गत सूज कमी होते आणि सांधे मजबूत होतात.
याशिवाय, हिवाळ्यात कोमट पाणी पिणं, दररोज थोडा वेळ उन्हात राहणं आणि हलका व्यायाम करणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, थंड जमिनीवर बसणं, अनवाणी चालणं आणि थंड पदार्थ खाणं टाळा. वेदना तीव्र असतील किंवा बराच काळ टिकल्या तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
