काही लोक तर मजा आणि मस्तीत एवढी दारु पितात की, मग दुसऱ्या दिवशी उठणं ही कठीण होतं. काही लोक तर कॉकटेल दारु पितात ज्यामुळे सकाळी हँगओवर काही केल्या उतरत नाही. ज्यामध्ये उलट्या, गरगरणं, डोकं जड होणं यांसारख्या गोष्टी होतात, ज्यामुळे लोकांचं दुसरा दिवस वाया जातो.
पण अशा लोकांचे हँगओवर्स उतरवण्यासाठी काही टीप्स आहेत, ज्याच्या मदतीने लोकांना लवकर बरं वाटेल आणि हँगओव्हर उतरेल.
advertisement
मध
अल्कोहोलचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी मध गुणकारी आहे. त्यात चयापचय गतिमान करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे अल्कोहोल सहज पचते आणि हँगओव्हर निघून जातो.
फळे
हँगओव्हरपासून सुटका हवी असेल तर फळेही फायदेशीर आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सफरचंद आणि केळी अल्कोहोलची नशा दूर करण्यासाठी खूप मदत करतात. सफरचंद डोकेदुखीमध्ये खूप फायदेशीर आहे. केळीचा शेक मधात मिसळून घेतल्याने हँगओव्हरपासून सुटका मिळते.
दही
दारूचा नशा दूर करण्यासाठी दही खूप फायदेशीर आहे. हे इतर कोणत्याही घरगुती उपायापेक्षा चांगले आहे, पण त्यासोबत साखर वापरू नका.
आलं
जास्त मद्यपान केल्याने अस्वस्थता आणि उलट्या होतात. अशा वेळी आले बारीक करून त्यात एक चमचा मध मिसळून खावे. आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करतात आणि उलट्यांपासून त्वरित आराम देतात.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा)