TRENDING:

Summer Hacks : एसी सुरु असताना पंखा चालू ठेवावा की नाही? 90% लोकांना माहित नाही, पैसे वाचवतील 'या' टिप्स

Last Updated:

Using ac with ceiling fan : एसी सुरु असताना फॅन चालवावा की नाही, असे केल्यास काय होईल, वीजबिल कसे वाचवायचे. याबद्दल महिती घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळा सुरु झाला की, घरातले एसी बऱ्यापैकी सुरु होतात. दिवसभर रात्रीही एसी वापरले जातात. काही लोकांना एसी सुरु असताताना फॅन चालवावा की नाही असा प्रश्न असतो. आज याबाबद्दल आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देत आहोत. एसी सुरु असताना फॅन चालवावा की नाही, असे केल्यास काय होईल, वीजबिल कसे वाचवायचे. याबद्दल महिती घेऊया.
एसी आणि पंखा एकत्र वापरल्यास काय होते?
एसी आणि पंखा एकत्र वापरल्यास काय होते?
advertisement

एसी सुरु असताना फॅन चालवल्याने वीजबिल जास्त येते. पण खरं तर योग्य प्रकारे वापरल्यास पंखा आणि एसी एकत्र चालवणे फायदेशीर ठरू शकते. योग्य सेटिंग्ज वापरून तुम्ही तुमचे विजेचे बिल कमी करू शकता. चला पाहूया कसे.

एसी आणि पंखा एकत्र वापरल्यास काय होते?

एसी सुरु असताना आपण पंखा चालवला तर घरात थंड हवा अधिक वेगाने फिरते आणि एसी जास्त कमी करण्याची गरज पडत नाही. यामुळं रूमचं टेम्परेचर लवकर कमी होतं. म्हणजेच एसी जास्त वेळ जास्त पॉवरवर चालवण्याची गरज नसते. याच कारणामुळे अनेक तज्ञ एसीसोबत पंखा वापरण्याचा सल्ला देतात. फक्त पंखा सामान्य स्पीडवर वापरा.

advertisement

एसी आणि पंखा एकत्र वापरल्याने विजेची बचत होते का?

साधा विचार केला तर आपल्याला असं वाटू शकतं की, 2 उपकरणं सोबत कळवळ्याने वीजबिल जास्त येईल. पण खरं तर असं नाही. कारण पंखा खूप कमी वीज वापरतो आणि एसीचे तापमान खूप कमी केल्यास तो जास्त वीज वापरतो. म्हणून एसीसोबत पंखा लावल्यास संपूर्ण रूममध्ये थंड हवा पसरते आणि एसीचे तापमान खूप कमी करण्याची गरज पडत नाही.

advertisement

चांगल्या कूलिंगसाठी योग्य सेटिंग काय आहे?

तुम्ही एसी आणि पंखा एकत्र वापरत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. अशावेळी तुम्ही एसी 24 ते 26 अंशांवर ठेवून पंखा चालवू शकता. यामुळं घर लवकर थंड पडतं आणि वीजही कमी वापरली जाते. तसंच पंख्याचा स्पीड मध्यम ठेवा. थंड हवा बाहेर जाऊ नये म्हणून आणि कूलिंग जास्त काळ टिकण्यासाठी दारं आणि खिडक्या बंद ठेवा.

advertisement

पंखा कधी वापरू नये?

पंखा प्रत्येकवेळी वापरण्याची गरज नसते. रूम खूप लहान असेल किंवा एसीची हवा थेट रूममध्ये येत असेल तर पंखा चालवल्याने फारसा फरक पडणार नाही. तुमच्या गरजेनुसार आणि खोलीच्या आकारानुसार पंखा वापरा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रस्त्यावर पैसे मागितले, पण शेवटी ठरवलं अन् ट्रान्सजेंडर मनस्वीनं करून दाखवलं, VIDEO
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Hacks : एसी सुरु असताना पंखा चालू ठेवावा की नाही? 90% लोकांना माहित नाही, पैसे वाचवतील 'या' टिप्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल