माहितीनुसार आरोग्य मंत्रालयाने एक अहवाल तयार केला आहे. 2050 पर्यंत देशातील 44.9 कोटी लोक लठ्ठपणा किंवा जास्त वजनाने ग्रस्त असतील असं समोर आलं आहे. अशा परिस्थितीत भारत अमेरिकेनंतर लठ्ठपणाच्या समस्येशी झुंजणारा दुसरा देश बनेल. म्हणूनच आरोग्य मंत्रालयाने अन्न आणि औषध प्रशासन (FSSAI) च्या सहकार्याने एक नवीन धोरण तयार केलं आहे, ज्या अंतर्गत या अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगवर वॉर्निंग लेबल लावणं बंधनकारक केलं आहे. विशेष म्हणजे जंक फूडवर तंबाखूसारखे इशारे देण्याची तयारी पहिल्यांदाच केली जात आहे.
advertisement
BP Medicine : बीपीच्या गोळ्या घेऊन मॉडेलने संपवलं आयुष्य, किती खतरनाक आहे ब्लड प्रेशरचं औषध?
जंक फूडबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचललं आहे. जो सुरुवातीला सरकारी संस्थांमध्ये लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक संस्थांमध्ये सिगारेटप्रमाणेच तेल आणि साखरेचं प्रमाण दर्शवणारे बोर्ड आता लावले जातील.
या माहितीपूर्ण पोस्टर्स आणि डिजिटल बोर्डांचा उद्देश लोकांच्या पहिल्या पसंतीच्या समोसे, कचोरी, पिझ्झा, पकोडे, केळी चिप्स, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक्स आणि चॉकलेट पेस्ट्रीमध्ये साखर आणि तेलाचे योग्य प्रमाण किती आहे याची माहिती देणं आहे. अन्नपदार्थांवर तेल आणि साखरेबाबत माहिती देऊन ते किती अनहेल्दी खात आहेत, याबाबत सतर्क केलं जाणार आहे. लवकरच कॅफे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी इशारे लावले जातील असं वृत्त आहे. विशेष म्हणजे लाडूपासून ते वडा पाव आणि पकोड्यापर्यंत अनेक पदार्थांचा या यादीत समावेश आहे.
Heart Attack : योगा करताय तर सांभाळूनच, येऊ शकतो हार्ट अटॅक
कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेचे प्रमुख डॉ. अमर आमले यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, साखर आणि ट्रान्स फॅट हे नवीन काळातील सिगारेट आणि तंबाखू आहेत. साखर आणि तेलामुळे हे अन्नपदार्थ धूम्रपान आणि तंबाखूइतकेच धोकादायक ठरत आहेत. आता अन्नपदार्थ जितके हानिकारक असतील तितकेच त्यांच्यावर लेबलिंग केलं जाईल. लोकांना ते काय खात आहेत हे माहित असले पाहिजे.