TRENDING:

Shoes Washing Tips : वॉशिंग मशीनमध्ये महागडे शूज धुताय? नुकसान टाळण्यासाठी ही वस्तूही टाका..

Last Updated:

मशीनमध्ये शूज धुण्यापूर्वी प्रोडक्ट लेबल वाचणे महत्त्वाचे आहे. महाग किंवा स्वस्त, शूज स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे शूज जास्त काळ खराब होत नाहीत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हाताने शूज धुण्याचे कष्ट टाळण्यासाठी बरेच लोक वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांप्रमाणेच शूज धुण्यास प्राधान्य देतात. मशीनमध्ये शूज धुण्यापूर्वी प्रोडक्ट लेबल वाचणे महत्त्वाचे आहे. महाग किंवा स्वस्त, शूज स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे शूज जास्त काळ खराब होत नाहीत. आज आम्ही तुम्हाला मशीनमध्ये शूज धुण्याच्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे काम सोपे होईल आणि तुमचे शूज खराब होणार नाहीत.
News18
News18
advertisement

मशीनमध्ये शूजसोबत जुना टॉवेल टाका

मशिनमध्ये शूज धुताना त्यात जुना टॉवेल टाकल्याने शूजमधील घर्षण कमी होईल आणि कमी नुकसान होईल. अनेक वेळा बुटाच्या लेस अडकतात, त्यामुळे अशा वेळी टॉवेल मदत करेल. टॉवेल टाकल्याने शूजच्या आतील घाण आणि मशीनमधील लिंट दोन्ही अडकतील. ॲथलेटिक शूज मशीन धुत असताना त्यात टॉवेल टाकावा.

advertisement

शूज मध्यम सायकलवर धुवा

तुम्ही वॉशिंग मशिनमधील शूज मध्यम स्वच्छ (Medium Cleaning) धुवा सायकलवर धुवावेत. कारण शूज हेव्ही क्लिनिंग ऑप्शनवर धुतल्याने खराब होऊ शकतात किंवा व्यवस्थित धुतले जात नाहीत. तसेच शूज नेहमी थंड पाण्याने धुवा.

शूज धुण्यासाठी लॉन्ड्री बॅग वापरा

महागडे शूज लाँड्री बॅगमध्ये ठेऊन ते मशीनमध्ये धुतल्याने शूजला इजा होत नाही. या युक्तीमुळे शूज सामान्य पद्धतीने धुतले जातील आणि ते मशीनमध्ये एकमेकांवर आदळणार नाहीत.

advertisement

तुमचे शूज थेट मशीनमध्ये टाकू नका

तुमचे शूज खूप घाण झाले असतील तरीही ते थेट वॉशिंग मशिनमध्ये टाकू नका. त्यामुळे मशिनमध्ये अडकून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शूज मशीनमध्ये धुण्याआधी तुम्ही ते थंड पाण्याने आणि साबणाने धुवावे आणि नंतर ते मशीनमध्ये टाकावे.

मशीनमध्ये कोणते शूज धुतले जाऊ शकतात?

सर्व प्रकारचे शूज मशीनने धुतले जाऊ शकत नाहीत. तुम्ही दर आठवड्याला कॅनव्हासचे शूज मशीनने धुतल्यास त्यांचा पोत खराब होईल. वॉशिंग मशिनमध्ये चुकूनही लेदर, टाच, बूट इत्यादी धुवू नयेत. कारण ते नंतर घालण्यायोग्य राहणार नाही. तसेच, फॉर्मल शूज मशीनने धुवू नयेत.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Shoes Washing Tips : वॉशिंग मशीनमध्ये महागडे शूज धुताय? नुकसान टाळण्यासाठी ही वस्तूही टाका..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल