TRENDING:

Health Tips : सुजलेले पाय आणि पांढरी जीभ, शरिरात दिसणारी 5 लक्षण देतात गंभीर आजारांचे संकेत

Last Updated:

आरोग्याची समस्या निर्माण होते किंवा शरिरात काही बिघाड जाणवतो, तेव्हा आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी शरीराने दिलेले संकेत म्हणजेच शरीराची भाषा जाणून घ्यायला हवी. जेव्हा आरोग्याची समस्या निर्माण होते किंवा शरीरात काही बिघाड जाणवतो, तेव्हा आपलंच शरीर आपल्याला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. अशा परिस्थितीत ती सूचना समजून घेणं महत्त्वाचं आहे. बहुतांश जण त्या सूचनेकडे दुर्लक्ष करतात, असं केल्यामुळे एखाद्या गंभीर आजाराची तीव्रता आपण वाढवत असतो.
शरिरात दिसणारी 5 लक्षण आहेत गंभीर आजारांचे संकेत
शरिरात दिसणारी 5 लक्षण आहेत गंभीर आजारांचे संकेत
advertisement

ताप येणार असेल तर त्यापूर्वी थंडी वाजते, सर्दी, खोकला, डोकेदुखी इत्यादी त्रास जाणवू लागतो. आता या संकेतांमध्ये काही गोष्टींकडे आपण सामान्य म्हणून दुर्लक्ष करतो; मात्र असं करणं म्हणजे आरोग्याला गंभीर धोका निर्माण करण्यासारखं आहे.

Milk : दूध तापवायचं की उकळवायचं? तुम्ही काय करता? जाणून घ्या योग्य पद्धत

डोळ्यांमध्ये बदल : हाय कोलेस्टेरॉल

advertisement

डोळ्यांवरून कोणाचं आरोग्य कसं आहे, हे अगदी सहज समजू शकतं. यासाठीच डॉक्टरसुद्धा आधी डोळे तपासतात. डोळ्यांमध्ये पांढरी वर्तुळं किंवा डाग असतील तर ते कॉर्निअल आर्क्सचा संकेत देतात. ते शरीरात चरबी जास्त साठल्यामुळे तयार होतं. हे वाढलेल्या कोलेस्टेरॉलचं लक्षण असू शकतं. त्यावर उपचार न केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. कमी दिसत असेल, तर हे मधुमेहाचं लक्षणसुद्धा असू शकतं.

advertisement

पांढरी जीभ : सीलिएक डिसीज

आपली जीभ बाहेर काढून तिचा रंग बघा. ती गुलाबी असेल तर काळजी करण्याचं कारण नाही; पण जिभेचा रंग पांढरा किंवा पिवळा दिसत असेल तर ते सीलिएक डिसीज (पचनासंबंधीचा आजार) असल्याचं लक्षण आहे. ती ऑटोइम्युन स्थिती आहे. त्यामध्ये शरीर ग्लूटेन पचवू शकत नाही आणि अशा परिस्थितीत ग्लूटेनचा समावेश नसलेल्या गोष्टी सेवन करणं आवश्यक असतं. ते पोषक तत्त्वं शोषून घेणं थांबवू शकतं. त्यामुळे या आजाराचा पहिला संकेत तुमच्या जिभेवर दिसायला लागतो.

advertisement

चामखिळीचा रंग किंवा आकार बदलणं : त्वचेचा कॅन्सर

तज्ज्ञ सांगतात, की शरीरावर तीळ, मस असणं ही अगदी सामान्य बाब आहे; पण त्याचा आकार आणि रंग सातत्याने बदलत असेल तर त्वचेचा कॅन्सर असण्याच्या शक्यतेचा हा एक संकेत आहे. याला मेलेनोमा असं म्हणतात. शरीरावर असणारे तीळ आणि चामखीळ यांवर लक्ष ठेवावं आणि जर या जागेवर खाज येत असेल, सूज असेल किंवा काही जखम आढळली, त्याचा आकार किंवा रंग यामध्ये बदल जाणवला, त्यातून रक्त येऊ लागलं किंवा ती जागा खवल्यांसारखी दिसू लागली तर तातडीनं वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे.

advertisement

अभिनेत्री अनुष्का शर्मा पिते ‘हे’ खास दूध, जाणून घ्या फायदे

सुजलेले पाय : मूत्रपिंडाची समस्या

हात आणि पाय सुजलेले असतील, त्वचेला खाज सुटत असेल आणि झोपताना त्रास होत असेल, थकवा जाणवत असेल तर मूत्रपिंडाशी संबंधित समस्या असू शकते. खरं तर, जेव्हा मूत्रपिंड शरीरात योग्य रीतीने काम करत नसतं तेव्हा शरीरात सोडियम किंवा मीठ साचून राहण्यास सुरुवात होते. त्यामुळे हातांवर, पायावर, घोट्याजवळ सूज येऊ शकते. शरीरामध्ये सोडियम-पाणी यांचं प्रमाण सम पातळीत राखण्यासाठी पदार्थ अतिरिक्त द्रव येतात. म्हणून असं घडू शकतं.

नखावरच्या रेषा : थायरॉइडसंबंधी समस्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

नखांवर पांढऱ्या रेषा दिसत असतील तर ही थायरॉइड ग्रंथींशी संबंधित समस्या असू शकते. कित्येक वेळा या रेषा कॅल्शिअम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन ए यांच्या कमतरतेमुळेसुद्धा दिसू शकतात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : सुजलेले पाय आणि पांढरी जीभ, शरिरात दिसणारी 5 लक्षण देतात गंभीर आजारांचे संकेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल