Relationship Tips : या 5 गोष्टी बिघडवतील तुमचं नातं, तुम्ही तर करत नाही ना ही चूक
अविश्वास
विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया असतो. पती त्याच्या पत्नीवर किंवा पत्नीला तिच्या पतीवर संशय घेत असेल तर असं नातं फार काळ टिकत नाही आणि टिकलं तरीही त्यात कटुता येते. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं नातं टिकवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जोडीदारावर विश्वास हा दाखवावाच लागेल. काही समस्या असतील तर एकमेकांशी मोकळेपणाने बोला. बऱ्याचदा अनावश्यक अविश्वासामुळे नातेसंबंधांमध्ये आणखी दरी निर्माण होते.
advertisement
सुसंवाद
जर तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये सुसंवादाचे नसेल तर तुमचं नातं टिकणं कठीण आहे. कारण जर तुम्ही एकमेकांशी नीट बोलत नसाल, एकमेकांशी संवाद साधत नसाल तर तुम्हाला एकमेकांची सुखं-दुखं कळणार नाहीत. तुम्ही एकमेकांपासून दुरावू शकता. तुमच्या आयुष्यात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होईल जो तुमच्या नात्यासाठी घातक ठरू शकतो.
तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप
एखाद्या दाम्पत्याचं भांडण झालं की त्यांची समजूत काढण्यासाठी म्हणा किंवा आणखी कोणत्या उद्देशाने तिसरी व्यक्ती अनेकदा प्रत्येक नात्यात हस्तक्षेप करते. परंतु या हस्तक्षेपाचा वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हस्तक्षेप करणारी व्यक्ती तुमचा मित्र, मैत्रिण, आई-वडिल किंवा अगदी तुमचा मुलगा किंवा मुलगी जरी असली तरीही त्यांच्या हस्तक्षेपाचा परिणाम हा तुमच्या नात्यावर होऊ शकतो. याचं कारण अगदी साधं आणि सोपं आहे. हस्तक्षेप करण्याऱ्या व्यक्तीने कोणाची एकाची बाजू जरी घेतली तरीही समोरची व्यक्ती नाराज होऊ शकते आणि त्यांनी दोघांच्या बाजूने, जरी सर्वसमावेशक निर्णय दिला तरीही तुम्ही नाराजच राहाल. तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप अनेक चुकीच्या निर्णयांना कारणीभूत ठरू शकतो.
क्या सुखी वैवाहिक जीवन के लिए साथी की उम्र अधिक होनी चाहिए? क्या उम्र का अंतर रिश्ता जोखिम भरा है?