Relationship Tips : या 5 गोष्टी बिघडवतील तुमचं नातं, तुम्ही तर करत नाही ना ही चूक

Last Updated:

कोणताही निर्णय घेणं घाईचं ठरतं. अशा वेळी जोडीदारापासून ब्रेक घेऊन शांत विचार करून निर्णय घ्या." नात्यात दुरावा येणाऱ्या काही गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

News18
News18
uiमुंबई : नात्यात असताना आपल्या जोडीदाराचा विचार करणं, त्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. रिलेशनशिप कोच मार्लेना टिलहॉन म्हणते, "नात्यात, आपण कसा विचार करतो, आपण कसं वागतो, आपण एकमेकांना कसं समजवून घेतो आणि आपण आपल्या भावना कशा व्यक्त करतो, या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो.
नात्यात दुरावा आला की बरेच लोक संभ्रमात असतात की ते संपवायचं की नाही? काही जण आपला जोडीदार बदलण्याचा प्रयत्न करतात, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतात किंवा तडजोड करतात. हा संभ्रमाचा काळ असतो, ज्यामुळे अस्वस्थता राहते. अशा काळात कोणताही निर्णय घेणं घाईचं ठरतं. अशा वेळी जोडीदारापासून ब्रेक घेऊन शांत विचार करून निर्णय घ्या." नात्यात दुरावा येणाऱ्या काही गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
1. वेगळे विचार: काहीवेळा आपण नात्याबद्दल वेगळे विचार असणाऱ्या व्यक्तीशी रिलेशनशिपमध्ये येतो. सुरुवातीला सगळं चांगलं चाललं असतं, पण नंतर भांडणं होऊन दुरावा येऊ लागतो. त्यामुळे नात्याच्या सुरुवातीलाच गंभीरपणे या बाबत बोलायला हवं. जेणेकरून तुम्ही एकमेकांसाठी किती योग्य आहात, ते कळू शकेल.
2. मर्यादा क्लिअर नसणं : अनेकदा नवीन नात्यात आल्यानंतरही आपण आपल्या पूर्वीच्या जोडीदाराच्या संपर्कात राहतो. या अस्पष्ट सीमा नव्या नात्यावर परिणाम करू शकतात आणि अडचणीत आणू शकतात. नवीन नातं निवडताना आपण पूर्वीच्या जोडीदाराबद्दल काही सीमा आखल्या पाहिजेत.
advertisement
3. नातं गोपनीय ठेवणं: नातं गोपनीय ठेवायला पाहिजे, पण ते पूर्णपणे लपवणं योग्य नाही. जेव्हा आपण आपल्या जोडीदारांबद्दल बाहेर सांगत नाही तेव्हा त्यांना वाटतं की आपण त्यांना महत्त्व देत नाही. याचा त्यांच्यावर भावनिक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जोडीदार आणि नात्याला प्राधान्य द्यायला शिकायला पाहिजे.
4. असुरक्षिततेची भावना: तुमची असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी तुमच्या जोडीदाराने नेहमी सावध वागावं अशी अपेक्षा करणे चुकीचं आहे. त्यामुळे नात्यात तणाव निर्माण होतो. आपण अधिक भावनिक जागरूक व्हायला पाहिजे व आपली असुरक्षिता दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
advertisement
5. छोट्या छोट्या गोष्टींच्या तक्रारी: प्रत्येक लहानसहान गोष्टीला मुद्दा बनवून तक्रार करणं चांगलं नाही. कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आणि कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं हे समजायला हवं. काही गोष्टी आपापल्या पातळीवर सोडवल्या पाहिजेत. तुमच्या मनात तरीही काही असेल तर जोडीदाराशी मनमोकळेपणानं बोललं पाहिजे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Relationship Tips : या 5 गोष्टी बिघडवतील तुमचं नातं, तुम्ही तर करत नाही ना ही चूक
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement