योग्य तयारी करा
प्रवासाला जाण्यापूर्वी आपल्यासोबत सॅनिटरी पॅड्स, टॅम्पॉन्स किंवा मेन्स्ट्रुअल कप यांची पुरेशी संख्या ठेवा. जर तुम्ही स्विमिंग करण्याचा विचार करत असाल, तर टॅम्पॉन्स किंवा मेन्स्ट्रुअल कप सोबत ठेवा.
पाण्याची बाटली सोबत ठेवा
मासिक पाळीदरम्यान शरीराला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. भरपूर पाणी प्या. यामुळे क्रॅम्प्स कमी होतात आणि पोटात गोळा आल्यासारखे वाटत नाही. गरम पाणी पोटातील स्नायूंना आराम देण्यास मदत करते.
advertisement
हलका व्यायाम करा
प्रवासादरम्यानही थोडा हलका व्यायाम करा. योगाच्या काही पोझेशन्स, स्ट्रेचिंग किंवा फक्त हळू चालल्यानेही शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि वेदना कमी होतात.
औषधे आणि गरम पाण्याची पिशवी
प्रवासात क्रॅम्प्ससाठी आवश्यक असलेली औषधे सोबत ठेवा. यासोबतच एक गरम पाण्याची पिशवी किंवा हीटिंग पॅड ठेवा, ज्यामुळे पोटदुखी आणि कंबरदुखीला आराम मिळेल.
नैसर्गिक टिप्स वापरा
पोटाच्या क्रॅम्प्ससाठी तुम्ही हर्बल चहा, जसे की आले किंवा कॅमोमाईल चहा, पिऊ शकता. हे नैसर्गिकरित्या वेदना कमी करतात. वेकेशनवर जंक फूडऐवजी ताजी फळे आणि भाज्या खा.
आरामदायक कपडे परिधान करा
टाइट कपड्यांऐवजी सैल आणि आरामदायक कपडे घाला. सूती किंवा रेयॉनसारख्या मऊ फॅब्रिकचे कपडे मासिक पाळीदरम्यान अधिक आरामदायी वाटतात. मासिक पाळीदरम्यान वेदना होणे सामान्य आहे, पण योग्य तयारी आणि नैसर्गिक उपायांनी तुम्ही वेकेशनचा पूर्णपणे आनंद घेऊ शकता.