स्कीइंग रिसॉर्ट्स म्हणजे काय ?
सर्वसामान्यपणे एखाद्या हिलस्टेशन किंवा समुद्राच्या जवळ बीचला लागून असलेलं पंचतारांकित, सप्ततारांकित हॉटेल म्हणजे रिसॉर्ट. मात्र स्कीइंग रिसॉर्ट्स हे बर्फाळ प्रदेशात असतात. जिथे सतत बर्फवर्षाव होत असतो, बर्फाचे घट्ट थर असतात आणि जिथे लोकं बर्फात खेळण्याचा, स्कीइंग किंवा स्नोबोर्डिंगसारख्या खेळांचा आनंद घेऊ शकतात. बर्फाळ प्रदेशात असलेले, स्कीइंग खेळाच्या विविध सुविधा देणारं हॉटेल म्हणजे स्कीइंग रिसॉर्ट्स.
advertisement
स्कीइंग रिसॉर्ट्स मधल्या सुविधा
उत्साही, नवशिक्या पर्यंटकांसाठी ट्रेनिंग आणि सौम्य उतार :
स्कीइंग हे विविध टप्प्यात करता येतं. जसं पोहण्यासाठी उथळ, खोल आणि मध्यम खोलीचे स्वीमिंग पूल असतात तसंच स्कीइंग करताना विविध प्रकारांचे उतार तयार केले जातात. जेणेकरून नवशिके, खेळाडू या खेळाचा आनंद घेऊ शकतील.
स्कीइंग ट्रेनर:
तुम्ही पर्यटक आहात, तुम्ही कधीही स्कीइंग केलेले नाही, मात्र तुम्हाला या साहसी खेळाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे मार्गदर्शन करण्यासाठी कोच उपलब्ध असतील.
स्कीइंग लिफ्ट:
अनेकादा चित्रपटांमध्ये किंवा सोशल मीडियावर आण स्कीईंगचे व्हिडिओ पाहिले आहेत. फार उंचीवरून स्कीइंग करत किंवा स्केटबोर्डवरून व्यक्ती खाली येतात. उंचीवरून काही सेकंद किंवा मिनिटात खाली येता येऊ शकतं मात्र पुन्हा सगळं घेऊन वर जाण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे हा वेळ वाचवण्यासाठी स्कीइंग रिसॉर्टमध्ये लिफ्ट किंवा केबल कार, गंडोलाची सुविधा असते.
स्नो ॲक्टिव्हिटी:
स्कीइंग व्यतिरिक्त, स्नोमॅन मेकिंग, स्नोशूइंग आणि स्नोमोबाईल राइड्स असे विविध मनारंजनाचे खेळही इथे खेळता येऊ शकतात.
स्कीइंग गियर :
स्कीइंग गियर हे प्रचंड महाग असतात. तुम्हाला स्कीइंग करताना त्याची आवश्यकता भासते. मात्र एकाच वेळेसाठी तुम्हाला स्कीइंग गियर विकत घ्यावे लागून अर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे स्कीइंग रिसॉर्टमध्ये स्कीइंग गियर हे भाड्याने उपलब्ध असतात.
भारतात स्कीइंग रिसॉर्ट्स कुठे ?
ज्या ठिकाणी सतत बर्फवृष्टी होते, कित्येक फूट उंचीचे बर्फाचे थर साचतात, साचून बर्फ घट्ट होतं अशा अतिथंड हवेच्या ठिकाणी स्कीइंग आढळून येतात. भारतात जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये चांगली बर्फवृष्टी होते त्यामुळे या राज्यात स्कीइंग रिसॉर्ट्सचा आहेत. जाणून घेऊयात काही स्कीइंग रिसॉटची माहीती.
- गुलमर्ग, काश्मीर : गुलमर्ग हे भारतातील सर्वात प्रसिद्ध स्कीइंग रिसॉर्ट आहे, येथे दरवर्षी जोरदार बर्फवृष्टी होते. स्कीइंग आवश्यत असलेले विविध लांबी, उंचीचे उतार इथे पाहायाला मिळतात.
- मनाली, हिमाचल प्रदेश: मनालीमध्ये स्कीईंगसाठी अनेक चांगली ठिकाणं आहेत. जसं की सोलांग व्हॅली, जिथे तुम्हाला स्कीइंग सोबतच अन्य खेळांचा अनुभव घेता येतो.
- अल्मोडा आणि नैनिताल, उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये असलेल्या या भागात स्कीइंग आणि इतर बर्फातले खेळ लोकप्रिय आहेत.
- रोहतांग पास, हिमाचल प्रदेश: रोहतांग पास हे स्कीइंग साठी प्रसिद्ध ठिकाण आहे, जे मनालीजवळ आहे.
- कुल्लू, हिमाचल प्रदेश: कुल्लू येथे काही स्कीइंग स्पॉट्स पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत.