दरवर्षी दिवाळीच्या काळात अनेकांना त्वचेवर जळजळ, अॅलर्जी, पुरळ आणि कोरडेपणा जाणवतो. फटाक्यांचा धूर आणि उष्णता विशेषतः मुलांसाठी आणि संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठी हानिकारक असू शकते. म्हणूनच, दिवाळी साजरी करण्यासोबतच त्वचेची काळजी घेण्याला प्राधान्य देणं महत्वाचं आहे.
फटाक्यांमुळे त्वचेला होणारं नुकसान -
धुरातील रसायनं: फटाक्याच्या धुरात सल्फर, नायट्रेट्स आणि जड धातू असतात, ज्यामुळे त्वचेवर ऍलर्जी आणि जळजळ होऊ शकते.
advertisement
उष्णता आणि ठिणग्या: फटाके किंवा अनार यांसारख्या फटाक्यांमधून निघणारी उष्णतेमुळे त्वचेला दाह जाणवतो.
Face Pack : राईस फेसपॅकचे तीन पर्याय आणतील चेहऱ्यावर ग्लो, नक्की वापरुन बघा
कोरडेपणा आणि जळजळ: हवेतील धुरामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते, ज्यामुळे कोरडेपणा, खाज येणं आणि लालसरपणा येऊ शकतो.
मेकअप आणि धूळ यांचं मिश्रण: सणांच्या काळात, जास्त मेकअप आणि बाहेरील धूळ एकत्रितपणे छिद्रांना ब्लॉक करतात, ज्यामुळे मुरुमं आणि पुरळ वाढू शकतं.
दिवाळीसाठी खास त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स
दिवाळीपूर्वी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरा. कोरफडीचा गर किंवा गुलाबपाणी वापरा. यामुळे तुमची त्वचा मऊ होते.
फटाके वाजवल्यानंतर त्वचा स्वच्छ करा: बाहेरून आल्यानंतर, सौम्य फेस वॉशनं चेहरा धुवा. टोनरनं तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करा आणि मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.
हायड्रेशन आणि आहाराकडे लक्ष द्या: त्वचा आतून हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.
फळं आणि भाज्यांचं सेवन वाढवा, विशेषतः व्हिटॅमिन सी आणि ई समृद्ध असलेले.
Diwali : फटाक्यांच्या धुरापासून जपा, प्रदूषणामुळे तब्येतीवर होतो परिणाम
घरगुती उपाय करून पहा:
नारळाच्या तेलानं त्वचा चांगली मॉइश्चरायझ होते आणि जळजळ कमी होते.
तुळशीची पानं आणि बटाट्याच्या रसामुळे त्वचेला थंडावा आणि पोषण मिळतं.
गाजराच्या रसात व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, यामुळे त्वचेची दुरुस्ती होते.
त्वचा जळजळत असेल तर -
ज्या भागात जळजळ जाणवते आहे, तो भाग ताबडतोब थंड पाण्यानं धुवा. कोरफडीचा जेल किंवा आईस पॅकचा वापर करा. जळजळ जास्त जाणवत असेल किंवा फोड आले असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.