कापलेलं सफरचंद जसंच्या तसं ठेवण्यासाठी काही सोप्या युक्त्या आहेत. यांचा वापर करून तुम्ही सफरचंद काळं पडण्यापासून वाचवू शकता. यामुळं सफरचंदं दीर्घकाळ फ्रेश राहील आणि त्याचे पौष्टिक मूल्यही टिकू राहू शकतात.
सफरचंद साठवण्यासाठी सोप्या युक्त्या..
- सफरचंद साठवण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे, मिठाचे पाणी. एका भांड्यात थंड पाणी भरा, त्यात चिमूटभर मीठ घाला आणि व्यवस्थित मिसळा. त्यानंतर कापलेले सफरचंदाचे तुकडे या पाण्यात 5 ते 10 मिनिटे भिजवून ठेवा. यामुळे सफरचंदामधील ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते आणि त्याचा रंग बदलत नाही. त्यानंतर सफरचंद बाहेर काढून स्वच्छ कापडाने कोरडे करा आणि एका बंद डब्यात साठवा. यामुळे सफरचंद जास्त काळ ताजे राहते.
advertisement
- मिठाच्या पाण्याव्यतिरिक्त तुम्ही लिंबाचा रसदेखील वापरू शकता. लिंबामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. त्यामुळे लिंबाचा रस सफरचंदावर लावल्यास ते लवकर खराब होता नाही किंवा काळं पडत नाही. लिंबाची चव तशी सौम्य असते, त्यामुळे सफरचंदाच्या मूळ चवीवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. जर तुम्हाला मुलांच्या डब्या सफरचंद द्यायचं असेल तर ही पद्धत तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. करा यामुळे फळ जास्तकाळ फ्रेश राहतं.
- न कापलेलं सफरचंद दीर्घकाळ फ्रेश ठेवण्यासाठी ते नेहमी थंड, कोरड्या जागी साठवावीत. सफरचंदाला जास्त उष्णता आणि आर्द्रता सहन होत नाही. यामुळं ते लवकर खराब होऊ शकतात. सफरचंद फ्रिजमध्ये ठेवताना ते कागदी किंवा छिद्र असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा, जेणेकरून त्यामध्ये हवा खेळती राहील.
- सफरचंद कधी केळीसोबत ठेवू नका. कारण त्यातून इथिलीन वायू बाहेर पडतो आणि यामुळं सफरचंद लवकर पिकून खराब होऊ शकतात. योग्य पद्धतीनं साठवल्यास सफरचंद अनेक दिवस फ्रेश राहू शकतात.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
