TRENDING:

Stuffed Bitter Gourd : हे 'स्टफ्ड फ्राईड कारलं' तुमचं जेवण बनवतील लज्जतदार! एकदा खाल तर वारंवार बनवाल..

Last Updated:

Stuffed Fried Bitter Gourd Recipe In Marathi : आज आम्ही तुम्हाला कारल्याची एक अशी भन्नाट रेसिपी सांगत आहोत, जी सगळे जण आवडीनं खातील. विशेष म्हणजेच यातलं कारलं अजिबात कडू लागणार नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कारलं बनवलंय म्हंटल की घरातली अर्धी मंडळी नाकं मुरडतात. खूप कमी लोकं कारलं आवडीनं खातात. बाकीच्यांना तर ते अजिबात सहन होत नाही. मुलं तर कारल्याला तोंडही लावत नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला कारल्याची एक अशी भन्नाट रेसिपी सांगत आहोत, जी सगळे जण आवडीनं खातील. विशेष म्हणजेच यातलं कारलं अजिबात कडू लागणार नाही.
स्टफ्ड फ्राईड कारलं बनवण्याची सोपी पद्धत..
स्टफ्ड फ्राईड कारलं बनवण्याची सोपी पद्धत..
advertisement

आज आम्ही तुम्हाला भरलेलं सुकं आणि फ्राय केलेलं कारलं कसं बनवायचं ते सांगत आहोत. ही रेसिपी stylishachari या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केली गेली आहे. यामध्ये अगदी सोप्या पद्धतीनं कारलं बनवलेलं दाखवलं आहे, जे खूप चविष्ट आणि हेल्दी आहे. चला पाहूया रेसिपी.

स्टफ्ड फ्राईड कारलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य..

- कारले

- हळद

advertisement

- मीठ

- पाणी

- लसूण

- हिरवी मिरची

- लाल तिखट

- धणेपूड

- जिरेपूड

- गरम मसाला

- ओवा

- पांढरे तीळ

- पिठी साखर

- कोथिंबीर

स्टफ्ड फ्राईड कारलं बनवण्याची सोपी पद्धत..

- सर्वात आधी कारल्याची दोन्ही बाजूची टोकं कापा.

- त्यानंतर कारल्याच्या वरचा खडबडीत भाग काढून टाका.

advertisement

- आता एका पातेल्यामध्ये हे कारले, थोडी हळद, मीठ आणि पाणी टाकून उकडून घ्या.

- त्यानंतर का खलबत्त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची टाकून कुटा.

- त्यानंतर यामध्ये तुमच्याकडे असलेले कोणतेही फरसाण टाकून कुटा.

- आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्या.

- त्यानंतर यामध्ये लाल तिखट, हळद, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला आणि तुमच्याकडे जो मसाला असेल तो टाका.

advertisement

- यानंतर त्यामध्ये ओवा, पांढरे तीळ, बारीक केलेली साखर, कोथिंबीर आणि मीठ टाकून हे सर्व व्यवस्थित एकत्र करा.

- आता उकडलेले कारले घ्या. त्यांना मधून चीर पडून त्यातल्या बिया काढून घ्या.

- आता या कारल्यामध्ये आपण बनवलेले मसाल्याचे मिश्रण टाका.

- कारले व्यवस्थित भल्यानंतर त्यांना दोऱ्याने पाक करून घ्या.

- आता एका कढईमध्ये कारले शॅलो फ्राय करण्यासाठी तेल टाकून गरम करा.

advertisement

- तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कारले टाकून ते सर्व बाजूंनी व्यवस्थित तळून घ्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Stuffed Bitter Gourd : हे 'स्टफ्ड फ्राईड कारलं' तुमचं जेवण बनवतील लज्जतदार! एकदा खाल तर वारंवार बनवाल..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल