TRENDING:

Summer Hacks : उन्हाळ्यात टॉप फ्लोअरच्या फ्लॅटमध्ये राहणं असह्य झालंय? 'या' पद्धतींनी घर ठेऊ शकता थंड

Last Updated:

बिल्डिंगचा वरचा मजला थेट सूर्यकिरणांच्या संपर्कात येतो. म्हणूनच इथलं तापमान सर्वाधिक असतं. अशी घरं थंड ठेवण्यासाठी काही सोपे उपाय तुम्ही करू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कडक उन्हात घराचं छत उन्हात खूप तापतं. आता बरेच लोक शहरात मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये राहतात. त्यामध्ये सर्वात वरचा मजला जो असतो, म्हणजे वरचा फ्लोअर तिथली घरं खूप तापतात. कारण हा मजला थेट सूर्यकिरणांच्या संपर्कात येतो. म्हणूनच वरच्या मजल्यांवरचं तापमान सर्वाधिक असतं. अशी घरं थंड ठेवण्यासाठी एसी शिवाय पर्याय नसतो.
घर थंड ठेवण्यासाठी करा हे उपाय..
घर थंड ठेवण्यासाठी करा हे उपाय..
advertisement

एअर कंडिशनरच्या वापराशिवाय वरच्या मजल्यांवरच्या घरात राहणं अगदी कठीण होऊन जातं. मात्र घाबरण्याचं कारण नाही. कारण एसीव्यवतिरिक्तही काही उपायांनी तुम्ही घर थंड ठेवून शकता. हे उपाय अनेक वर्षांपासून वापरले जात आहेत. यांचा उपायगोग तुम्हाला नक्कीच करता येईल.

घर थंड ठेवण्यासाठी करा हे उपाय..

सर्वात आधी तुम्ही घराच्या गच्चीत पांढरा कूल रूफ पेंट देऊन शकता. गच्चीवर चुना किंवा स्पेशल 'हीट रिफ्लेक्टिव्ह पेंट' लावा. पांढऱ्या रंगामुळे सूर्यप्रकाश परावर्तित होतो आणि तुमच्या घराचं तापमान 4°C ते 5°C ने कमी होईल.

advertisement

घराच्या गच्चीमध्ये जास्त रोपं लावा. या टेरेस गार्डनमुळे तुमची गच्ची तर कण दिसतेच, शिवाय फुला फळांची रोपं आणि माती उष्णता शोषून घेतात. पाऊले घराचं तापमान खूप प्रमाणात कमी होऊ शकतं.

संध्याकाळी घराच्या गच्चीमध्ये खस चटई अंथरा आणि त्यावर पाणी शिंपडा. यामुळे रात्रीच्यावेळी तुमचं घर लवकर आणि खूप थंड होईल. चटई नसली तरी फक्त गच्चीवर पाणी शिंपडून तुम्ही ते थंड करू शकता. यामुळे छताच्या काँक्रीटमधील उष्णता कमी होण्यास मदत होईल.

advertisement

घर थंड करण्यासाठी तुम्ही क्रॉस व्हेंटिलेशनचा उपयोग करू शकता. यासाठी संध्याकाळच्या वेळी घरातील एकासमोर एक असलेल्या खिडक्या उघडा. यामुळे बाहेरची थंड हवा घरात येईल आणि गरम हवा बाहेर जाईल.

घरात साचलेली गरम हवा बाहेर काढण्यासाठी दुपारच्या वेळी किचन आणि बाथरूममधील एक्झॉस्ट फॅन सुरु करा. याने घर लवकर थंड व्हायला मदत होईल. याशिवाय तुम्ही दिवसभर खिडकीला गडद पडदे लावू शकता. यामुळे दिवसा सूर्यप्रकाश थेट आत येणार नाही आणि घर जास्त तापणार नाही.

advertisement

घर थंड ठेवण्यासाठी तुम्ही सोलर पॅनेलचा वापर करू शकता. याने एकत्र तुमचं वीजबिलाही वाचेल आणि दुसरं म्हणजे गच्चीवर सोलर पॅनेल बसवल्यामुळे सूर्याची किरणे थेट तुमच्या छतावर न पडता सोलर पॅनेलवर पडतील. याने आपसूकच छताचं तापमान कमी होईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मित्राच्या शेतातून घेतलं पाणी, तरुणाने यशस्वी केली टोमॅटोची शेती, वर्षाला 7 लाख कमाई
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Hacks : उन्हाळ्यात टॉप फ्लोअरच्या फ्लॅटमध्ये राहणं असह्य झालंय? 'या' पद्धतींनी घर ठेऊ शकता थंड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल