पोटफुगीची समस्या कमी करण्यासाठी औषधं तात्काळ आराम देऊ शकतात, पण काही नैसर्गिक पदार्थ केवळ अर्ध्या तासात पोटफुगी कमी करू शकतात. यामुळे आराम जलद मिळतो आणि कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीत.
पपई - पपई हे एक उष्णकटिबंधीय फळ आहे. यात पपेन नावाचे एंजाइम असतं. या एंजाइममुळे पचनक्रिया जलद होते आणि आतड्यांत वायू तयार होण्यास प्रतिबंध होतो. पपई खाल्ल्यानं 20-25 मिनिटांत पोट भरल्यासारखं वाटतं.
advertisement
Skin Care : तांदळाच्या पीठानं चेहरा करेल ग्लो, जाणून घ्या वापराची पद्धत
काकडी - काकडीत अंदाजे 95% पाणी असतं, यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं आणि मूत्रमार्गे जास्त पाणी आणि वायू काढून टाकण्यास मदत होते. काकडीतले अँटीऑक्सिडंट क्युकरबिटासिनमुळे जळजळ कमी होते.
आलं - आल्यात जिंजरॉल आणि शोगाओल सारखे घटक असतात. यामुळे आतडी शांत होतात. आल्याचा चहा प्यायल्यानं किंवा आल्याचा एक छोटा तुकडा चावून खाल्ल्यानं अर्ध्या तासांत परिणाम दिसून येतात.
दही - दह्यातील प्रोबायोटिक्स हे चांगले बॅक्टेरिया आहेत. पोटदुखी कमी करण्यासाठी आणि पोटफुगी नियंत्रित करण्यासाठी बॅक्टेरिया मदत करतात. यासाठी जेवणानंतर एक वाटी दही खाणं परिणामकारक आहे.
पुदिना - पुदिनामुळे पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो आणि नैसर्गिकरित्या गॅस काढून टाकण्यास मदत होते. पुदिन्याचा चहा पिणं किंवा पुदिन्याची पानं चावणं यामुळे लवकर आराम मिळतो.
Blackheads : ब्लॅकहेड्स काढण्यासाठी हे उपाय नक्की करुन बघा, चेहरा दिसेल स्वच्छ
केळी - केळ्यातील पोटॅशियम सोडियम संतुलित करण्याचं काम करतं आणि पाण्याचं प्रमाण कमी करतं. यामुळे पचन सुधारतं आणि पोटातील जडपणा कमी होतो.
बडीशेप - बडीशेपेत एनेथोल नावाचा घटक असतो, वायू बाहेर काढण्यासाठी हा घटक उपयुक्त ठरतो. चिमूटभर बडीशेप चावून किंवा बडीशेपेचं पाणी प्यायल्यानं अर्ध्या तासांत पोटफुगी कमी होऊ शकते.
पोटफुगीपासून आराम मिळवण्यासाठी नेहमीच औषधांवर अवलंबून राहावं लागत नाही. वर उल्लेख केलेल्या काही नैसर्गिक पदार्थांमुळे पोटाला लवकर आराम मिळू शकतो. दैनंदिन आहारात हे पदार्थ खाल्ल्यानं पोटफुगीपासून आराम मिळतोच तसंच दीर्घकाळात पोटाच्या समस्या देखील टाळता येतात.
