TRENDING:

Heart Disease : सोप्या पण महत्त्वाच्या चाचण्या, हृदय आणि धमन्यांचं आरोग्य समजून घेणं आहे आवश्यक

Last Updated:

रक्तवाहिन्यांमधे अडथळे निर्माण होण्याची काळजी वाटत असेल, तर काही सोप्या घरगुती तपासण्या करून सुरुवातीची लक्षणं ओळखू शकता. रक्तवाहिन्यांमधे प्लाक जमा होणं थेट दिसणं शक्य नसलं तरी, हा त्रास होत असतो तेव्हा शरीर काही धोक्याचे संकेत देत असतं. यासाठी काही सोपे उपाय लक्षात ठेवा. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हृदयविकाराचं वाढतं प्रमाण, वाढणारा ताण तसंच फॅमिली हिस्ट्री असेल तर तुम्हाला प्रकृतीची चांगली काळजी घेणं गरजेचं आहे.
News18
News18
advertisement

रक्तवाहिन्यांमधे अडथळे निर्माण होण्याची काळजी वाटत असेल, तर काही सोप्या घरगुती तपासण्या करून सुरुवातीची लक्षणं ओळखू शकता. रक्तवाहिन्यांमधे प्लाक जमा होणं थेट दिसणं शक्य नसलं तरी, हा त्रास होत असतो तेव्हा शरीर काही धोक्याचे संकेत देत असतं. यासाठी काही सोपे उपाय लक्षात ठेवा.

नियमित रक्तदाब तपासणी - पहिली आणि सर्वात सोपी पद्धत म्हणजे रक्तदाब नियमितपणे तपासणं. अपर आर्म ऑटोमेटिक डिजिटल रक्तदाब मॉनिटर सर्वात विश्वासार्ह मानला जातो. रक्तदाब मोजण्यापूर्वी किमान पाच मिनिटं शांत बसा. पाय जमिनीवर टेकवा आणि पाठ टेकून बसा. नंतर, सकाळी आणि रात्री दोन वेळा रक्तदाब तपासा. हे एका आठवड्यासाठी करा, नंतर सर्व मोजमापांची सरासरी काढा.

advertisement

Processed Food : आवडलं म्हणून पोट भरुन खाऊ नका,प्रोसेस्ड फूडची सवय ठरते हानिकारक

जर तुमचा रक्तदाब वारंवार सामान्यपेक्षा जास्त वाढत असेल, तर ते धमन्यांमध्ये दाब वाढत असल्याचं लक्षण असू शकतं. साधारणपणे, 120/80 मिमीएचजीच्या आसपास रक्तदाब सामान्य मानला जातो.

अँकल ब्रॅचियल इंडेक्स - आणखी एक महत्त्वाची चाचणी म्हणजे अँकल ब्रॅचियल इंडेक्स. आरोग्य माहिती वेबसाइट मेयोक्लिनिकनुसार, या चाचणीमधे पाय आणि हातांमधील रक्तदाबाची तुलना होते. याचा वापर पेरिफेरल आर्टरी डिसीजचा धोका ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो. ही पद्धत विश्वासार्ह आणि लवकर तपासणीसाठी उपयुक्त मानली जाते.

advertisement

लिपिड प्रोफाइल चाचणी - तिसरी महत्त्वाची पायरी म्हणजे लिपिड प्रोफाइल चाचणी. आता अनेक प्रयोगशाळांमधे घरगुती नमुना संकलनाची सुविधा दिली जाते. या चाचणीत, एकूण कोलेस्टेरॉल, एलडीएल, एचडीएल आणि ट्रायग्लिसराइड्स मोजलं जातं.

Mental Health : 'हरकत-ओ-सुकून नफसानी' म्हणजे काय ? मनाला विश्रांती देणं शक्य ?

विशेषतः उच्च एलडीएल कोलेस्ट्रॉलमुळे धमन्यांमधे प्लेक जमा होण्याचा धोका वाढतो. चाचणीपूर्वी सामान्यतः बारा तासांचा उपवास आवश्यक असतो.

advertisement

पायऱ्या चढण्यास अडचण - चार मजल्यावरील पायऱ्या स्थिर गतीनं चढा. यावेळी, जर तुम्हाला छातीत दाब जाणवला, श्वास घ्यायला त्रास झाला, जबडा किंवा हातात वेदना किंवा चक्कर येत असेल तर ताबडतोब थांबा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, आले अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

लक्षणांचा कालावधी आणि ते कशामुळे सुरु झालं हे देखील लक्षात घ्या. यावेळेला जाणवणारी लक्षणं हृदयरोगाचा धोका दर्शवू शकतात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Disease : सोप्या पण महत्त्वाच्या चाचण्या, हृदय आणि धमन्यांचं आरोग्य समजून घेणं आहे आवश्यक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल