TRENDING:

Liver : फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष नको, सवयीत बदल करेल यकृताला मदत, या टिप्स नक्की वाचा

Last Updated:

फॅटी लिव्हरची समस्या जाणवण्याचं प्रमाण वाढलंय. योग्य आहार आणि निरोगी सवयींमुळे यकृत नव्वद दिवसांत स्वतःची दुरुस्ती सुरू करतं. यासाठी सात महत्त्वाचे बदल यकृत निरोगी बनवण्यात मदत करतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : यकृत हा आपल्या शरीराचा एक मूक अवयव, त्याचं काम शांतपणे सुरु असतं, पण फॅटी लिव्हर असेल तर यकृताचा त्रास वाढलाय समजा. खरं तर, खाण्याच्या सवयी चांगल्या असतील तर यकृताचा त्रास क्वचितच होईल.
News18
News18
advertisement

फॅटी लिव्हरची समस्या जाणवण्याचं प्रमाण वाढलंय. योग्य आहार आणि निरोगी सवयींमुळे यकृत नव्वद दिवसांत स्वतःची दुरुस्ती सुरू करतं. यासाठी सात महत्त्वाचे बदल यकृत निरोगी बनवण्यात मदत करतील.

साखर कमी खा

साखरेमुळे लठ्ठपणा तर वाढतोच पण साखर, विशेषतः फ्रुक्टोज, चरबीच्या स्वरूपात थेट यकृतात जमा होतात.

पॅकेज्ड ज्यूस, फ्लेवर्ड दही, एनर्जी बार आणि हेल्दी सिरप हे सर्व घटक यकृतावर अतिरिक्त भार टाकतात. ज्यूस आणि प्रक्रिया केलेले स्नॅक्स वगळून संपूर्ण फळं खाणं कायम चांगलं, फळांमधलं फायबर यकृतासाठी चांगलं.

advertisement

Brain : सात सोप्या टिप्सनं मेंदू होईल तंदुरुस्त, स्मरणासंबंधित आजारांचा धोका होईल कमी

आहारातील फायबर यकृतासाठी महत्त्वाचं

फायबरमुळे पचनक्रियेत खूप मदत होते. पण त्याची भूमिका यापेक्षा खूप जास्त आहे. फायबर इन्सुलिन संवेदनशीलता वाढवणं, सूज कमी करणं आणि हार्मोन्स संतुलित करण्यासाठी फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ महत्त्वाचे आहेत. चिया सीड्स, जवस, हरभरा, मसूर आणि ब्रोकोली सारख्या भाज्या यकृतासाठी ढाल म्हणून काम करतात.

advertisement

निरोगी चरबी म्हणजेच हेल्दी फॅट्सला प्राधान्य द्या

ओमेगा-3 सारखे काही फॅट्स खूप फायदेशीर आहेत. यामुळे यकृतात चरबी जमा होण्यास प्रतिबंध होतो आणि सूज कमी होते. यासाठी आहारात मासे, अक्रोड आणि जवस तेलाचा समावेश करा. प्रक्रिया केलेले तेल टाळा कारण त्यात ओमेगा-6 जास्त प्रमाणात असतं, यकृतासाठी हे हानिकारक ठरु शकतं.

पॉलीफेनॉलचे फायदे

advertisement

वनस्पतींमध्ये आढळणारे विशेष घटक पॉलीफेनॉल. शरीराला यातून अँटिऑक्सिडंट्स मिळतात. त्वचेसाठी आणि यकृतासाठी हे घटक महत्वाचे आहेत. डाळिंब, हळद, काळी मिरीसह, बेरी, माचा आणि ऑलिव्ह ऑइल या सर्व  घटकांमुळे यकृतातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो.

चांगल्या झोपेचं महत्त्व

रात्री उशिरापर्यंत जागं राहणाऱ्यांसाठी आणि जे लोक योग्य झोप घेत नाहीत त्यांना फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. म्हणूनच यकृताच्या आरोग्यासाठी दररोज सात-आठ तास गाढ झोप घेणं खूप महत्वाचं आहे.

advertisement

High Sugar : वाढलेली साखर हृदयासाठी घातक, वेळीच धोका ओळखा, आहारात बदल करा

वेळेवर जेवा

उशिरा जेवल्यानं यकृताच्या उपचार प्रक्रियेत अडथळा येतो. यकृत रात्री स्वतःची दुरुस्ती करत असतं. रात्री उशिरा स्नॅक्स खाल्ल्यानं ते पचवण्याचे काम यकृताला करावं लागतं. झोपण्यापूर्वी दोन-तीन तास ​​आधी जेवण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे यकृत साठवलेली चरबी जाळण्यास सक्षम होतं.

पॅक केलेलं आणि प्रक्रिया केलेलं अन्न खाणंटाळा

कमी चरबीयुक्त किंवा आहार असलेले लेबल असलेले पॅकेज केलेले पदार्थ नेहमीच निरोगी नसतात. त्यात रिफाइंड कार्ब्स, ट्रान्स फॅट्स असतात. यामुळे यकृताला नुकसान होतं. त्याऐवजी, घरी बनवलेलं अन्न, भाजलेले हरभरे, काजू किंवा ताजी फळं खा. यामुळे यकृताला खरं पोषण मिळेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातील असं एक गाव, जिथे घराच्या छतावर कोणीच लावत नाही कवेलू, काय आहे परंपरा?
सर्व पहा

जीवनशैलीतील बदलांद्वारे फॅटी लिव्हरवर उपचार केले जाऊ शकतात. पण दुर्लक्ष केलं तर फायब्रोसिस आणि नंतर सिरोसिसचा धोका वाढतो. सिरोसिसमध्ये, यकृताची अवस्था खराब होते ते काम करणे थांबवतं त्यामुळे अनेकदा प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Liver : फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष नको, सवयीत बदल करेल यकृताला मदत, या टिप्स नक्की वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल