advertisement

High Sugar : वाढलेली साखर हृदयासाठी घातक, वेळीच धोका ओळखा, आहारात बदल करा

Last Updated:

मधुमेह हृदयरोगाचं एक प्रमुख कारण बनला आहे. ज्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण सतत जास्त असतं त्यांना सामान्य लोकांपेक्षा हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक येण्याचा धोका जास्त असतो हे संशोधनातूनही स्पष्ट झालं आहे.

News18
News18
मुंबई : आजची माहिती मधुमेह आणि हृदयरोगासंदर्भातली...मधुमेह हृदयरोगाचं एक प्रमुख कारण बनला आहे.
ज्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण सतत जास्त असतं त्यांना सामान्य लोकांपेक्षा हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक येण्याचा धोका जास्त असतो हे संशोधनातूनही स्पष्ट झालं आहे.
मधुमेह भारतात वेगानं पसरतो आहे. यामुळे, रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम तर होतोच आणि हृदयरोगासाठीही मधुमेह कारणीभूत ठरू शकतो.
advertisement
साखरेमुळे हृदयरोगाचं प्रमाण वाढण्याची कारणं
- जास्त साखर, प्रक्रिया केलेलं अन्न म्हणजेच प्रोसेस्ड फूड आणि जास्त कार्बोहायड्रेट्सचं म्हणजेच कर्बोदकांचं सेवन.
- नियमित व्यायाम न करणं.
- झोपेची कमतरता आणि मानसिक ताणामुळे साखरेची पातळी वाढू शकते.
- कुटुंबातील एखाद्याला मधुमेह असेल तर मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
- गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळेही मधुमेह होतो.
advertisement
वाढलेल्या साखरेची लक्षणं
मधुमेहाची लक्षणं सुरुवातीला सौम्य असू शकतात, पण कालांतरानं ती स्पष्टपणे दिसून येतात:
वारंवार तहान लागणं
वारंवार लघवी होणं
जास्त भूक लागणं
वजन वेगानं कमी होणं
थकवा आणि अशक्तपणा जाणवणं
जखमा बऱ्या होण्यासाठी वेळ लागणं
त्वचेवर खाज सुटणं किंवा संसर्ग होणं
advertisement
ही लक्षणं दिसली तर रक्तातील साखरेची त्वरित तपासणी करावी.
हृदयरोगाची लक्षणं लक्षात ठेवा -
मधुमेहाचा हृदयावर थेट परिणाम होतो. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका -
छातीत वेदना होणं किंवा दाब जाणवणं
श्वास घेण्यात अडचण येणं
चालताना थकवा येणं
हृदयाचे ठोके अनियमित होणं
शरीरात विशेषतः घोट्यात आणि पायात सूज येणं
मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा सायलेंट हार्ट अटॅक येऊ शकतो, ज्यामुळे वेदना होत नाहीत परंतु हृदयावर खोलवर परिणाम होतो. म्हणून ही लक्षणं असतील तर वेळीच डॉक्टरांकडे जा, वेळेत उपचार करा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
High Sugar : वाढलेली साखर हृदयासाठी घातक, वेळीच धोका ओळखा, आहारात बदल करा
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement