Digestion : मजबूत पचनसंस्थेसाठी आयुर्वेदाची मदत, या नियमांमुळे होईल आरोग्यात सुधारणा

Last Updated:

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं अलीकडेच आयुर्वेदाचे सुवर्ण नियम म्हणजेच गोल्डन रुल्स जारी केले आहेत, खाण्याच्या सवयींमधे लहान बदल करून पचन आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. आयुर्वेद केवळ काय खावं हे शिकवत नाही, तर चांगलं पचन आणि आरोग्य लक्षात ठेवून जाणीवपूर्वक खाण्याचा मार्गदेखील सुचवले आहेत.

News18
News18
मुंबई : निरोगी जीवनासाठी पचनसंस्था मजबूत असणं आवश्यक आहे. याबद्दल, निष्काळजीपणा केला तर अन्न केवळ शरीरासाठी धोकादायक नाही तर अनेक समस्यांचं कारण ठरतं. आयुर्वेदात यासाठी सोपे आणि परिणामकारक उपाय सांगितलेत.
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं अलीकडेच आयुर्वेदाचे सुवर्ण नियम म्हणजेच गोल्डन रुल्स जारी केले आहेत, खाण्याच्या सवयींमधे लहान बदल करून पचन आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो.
advertisement
आयुर्वेद केवळ काय खावं हे शिकवत नाही, तर चांगलं पचन आणि आरोग्य लक्षात ठेवून जाणीवपूर्वक खाण्याचा मार्गदेखील सुचवले आहेत.
खाण्याची योग्य पद्धत
आयुर्वेदानुसार, योग्य अन्न म्हणजे केवळ ताटात असलेल्या गोष्टी नसून खाण्याची योग्य पद्धत देखील असते.
जेवण शांततेत आणि चांगल्या संगतीत केलं पाहिजे. जेवणादरम्यान राग, भीती किंवा ताण टाळण्याचा सल्ला आयुष मंत्रालयानं दिला आहे कारण याचा पचन प्रक्रियेवर परिणाम होतो. अन्नाचा आस्वाद घेणं आणि ते हळूहळू चावणं यामुळे अन्नाची चव वाढते तर पाचक एंजाइम देखील सक्रिय होतात.
advertisement
पाणी पिण्याची योग्य पद्धत
आयुर्वेदात पाणी पिण्याच्या पद्धतीकडेही लक्ष देण्यात आलंय. आयुष मंत्रालयाच्या मते, जेवणादरम्यान पाणी पिणं पचनासाठी फायदेशीर आहे. पण, जेवणानंतर पाणी पिण्यानं पचन प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. म्हणूनच जेवणानंतर चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांनी भरपूर पाणी प्यावं. यामुळे पचनसंस्थेवर दबाव येत नाही आणि अन्न सुरळीत पचतं.
advertisement
अन्न ताजं, ऋतूनुसार आणि शरीराच्या स्वभावाला अनुकूल असावं असा सल्लाही आयुर्वेदानं दिला आहे. तसंच जड जेवण टाळा आणि रात्रीचं जेवण हलकं ठेवा. हे छोटे बदल केल्यानं केवळ पचनसंस्था मजबूत होण्यासोबतच मानसिक आरोग्य देखील सुधारतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Digestion : मजबूत पचनसंस्थेसाठी आयुर्वेदाची मदत, या नियमांमुळे होईल आरोग्यात सुधारणा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement