Skin Care : त्वचेची काळजी घेण्यात या चुका करु नका, चेहरा दिसेल निस्तेज
- Published by:Renuka Joshi
 
Last Updated:
वार्धक्याच्या आधीच तारुण्यात सुरकुत्या दिसत असतील तर हा काळजीचा विषय आहे. केवळ वयच नाही तर आहार, जीवनशैली आणि त्वचेची काळजी यांचाही त्वचेवर परिणाम होतो.
मुंबई : वयानुसार त्वचेवर फरक दिसणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. वय वाढत असताना चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात ज्यामुळे त्वचेची लवचिकता कमी होते आणि त्वचा निस्तेज दिसते. त्याच वेळी, कपाळावर, डोळ्यांभोवती, ओठांभोवती आणि हनुवटीवर रेषा दिसू लागतात.
पण, वार्धक्याच्या आधीच तारुण्यात सुरकुत्या दिसत असतील तर हा काळजीचा विषय आहे. केवळ वयच नाही तर आहार, जीवनशैली आणि त्वचेची काळजी यांचाही त्वचेवर परिणाम होतो.
advertisement
चुकीच्या क्लींजरचा वापर
चेहऱ्यावर क्लींजर न लावल्यानं किंवा योग्य क्लींजर न वापरल्यानं, मृत त्वचेच्या पेशी चेहऱ्यावर जमा होऊ लागतात. चेहऱ्यावर जमा होणारा सेबम आणि धुळीमुळे त्वचेचं नुकसान होतं. यामुळे त्वचा अकाली वृद्ध होते.
मॉइश्चरायझर
त्वचा तेलकट असेल तर अनेकांना वाटतं चेहऱ्यावर मॉइश्चरायझर नाही लावलं तरी चालेल. चेहरा तेलकट दिसणं म्हणजे त्वचा हायड्रेटेड आहे असं अजिबात नाही. मॉइश्चरायझर लावून त्वचेला हायड्रेट केलं नाही तर त्वचा आतून कोरडी होऊ लागते आणि त्यामुळे त्वचेचं नुकसान होते.
advertisement
मेकअप लावून झोपणं
रात्री मेकअप लावून झोपलात तर यामुळे त्वचेचंही नुकसान होऊ शकतं. यामुळे वृद्धत्वाच्या खुणा लवकर दिसतात. मेकअप करत असाल तर चेहरा स्वच्छ करून आणि नंतर मॉइश्चरायझर लावल्यानंतरच झोपा.
सनस्क्रीन न लावणं
चेहऱ्यावर सनस्क्रीन लावलं नाही तर सूर्यामुळे चेहरा खराब होऊ शकतो. सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावर टॅनिंग तर होतंच पण त्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रियाही वेगवान होते. म्हणूनच सनस्क्रीन लावणं टाळू नका.
advertisement
त्वचेला हानी पोहचवणारी उत्पादनं वापरणं
चेहऱ्यावर कठोर आणि त्वचेला हानी पोहचवणारी उत्पादनं वापरण्यानं त्वचेलाही हानी पोहोचवू शकते. त्याच वेळी, कठोर उत्पादनं चेहऱ्यावर घासली जातात तेव्हा त्वचेची लवचिकता कमी होऊ लागते.
चेहऱ्यावर काहीही लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 22, 2025 5:36 PM IST


