advertisement

Dental Care : संत्र्याच्या सालानं दात होतील स्वच्छ, कसा करायचा वापर, वाचा सविस्तर

Last Updated:

संत्र्याच्या सालीचा वापर करून दातांवरील डाग  घालवण्यास मदत होऊ शकते. संत्र खायला चविष्ट असतातच तसंच त्याचं साल त्वचेसाठी आणि दातांसाठी खूप फायदेशीर असतं. त्यात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. याचा उपयोग दातांमधील विषाणू काढून टाकण्यासाठी आणि त्यांना चमक देण्यासाठी होतो.

News18
News18
मुंबई : दात घासल्यावर होते दिवसाची सुरुवात पण दात स्वच्छ झाले नाहीत तर काळजी वाटणं साहजिक आहे. कारण काहाजणांचे दात घासल्यानंतरही पिवळे आणि अस्वच्छ दिसतात. दात स्वच्छ पांढरे आणि मोत्यासारखे दिसायला हवे असतील तर घरगुती उपाय वापरुन पाहा.
संत्र्याच्या सालीचा वापर करून दातांवरील डाग  घालवण्यास मदत होऊ शकते. संत्र खायला चविष्ट असतातच तसंच त्याचं साल त्वचेसाठी आणि दातांसाठी खूप फायदेशीर असतं. त्यात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. याचा उपयोग दातांमधील विषाणू काढून टाकण्यासाठी आणि त्यांना चमक देण्यासाठी होतो.
संत्र्याच्या सालीचा वापर कसा करावा ?
ताज्या संत्र्याचं साल घ्या आणि त्याचा आतील पांढरा भाग दातांवर हलक्या हातानं घासा. दोन-तीन मिनिटं घासल्यानंतर, पाच मिनिटं तसंच राहू द्या. नंतर नेहमीच्या टूथपेस्टनं दात घासा. ही प्रक्रिया आठवड्यातून तीन चार वेळा करा. यामुळे दातांवरील पिवळा थर हळूहळू निघून जाईल आणि दात चमकदार दिसू लागतील.
advertisement
केवळ संत्रीच नाही तर केळी, लिंबू आणि पपईची सालं देखील दात स्वच्छ पांढरे करण्यासाठी उपयुक्त आहेत.
केळीची साल: केळीच्या सालातल्या पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुले दातांवरील घाण काढून टाकण्यासाठी मदत होते.
लिंबूची साल: लिंबाच्या सालातील सायट्रिक आम्ल डाग काढून टाकण्यास मदत करते, परंतु आठवड्यातून दोनदापेक्षा जास्त वेळा हे वापरू नका.
advertisement
पपईची साल: पपईची सालातलं पपेन एंझाइम दात स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त आहे.
या गोष्टी लक्षात ठेवा:
एखादा उपाय मिळाला म्हणून तो सतत आणि जास्त प्रमाणात करू नका कारण काही फळांमधल्या आम्लामुळे दातांवरचा मुलामा खराब होऊ शकतो.
advertisement
दातदुखी, दात संवेदनशील होणं किंवा इतर कोणतीही समस्या असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.
या घरगुती उपायांसोबतच, दररोज ब्रश करणं, फ्लॉस करणं आणि माउथवॉश वापरणं देखील महत्त्वाचं आहे.
पांढरे दात येण्यासाठी महागड्या उपचारांची गरज नाही. घरात असलेल्या संत्री, केळी आणि लिंबू यासारख्या फळांच्या साली नैसर्गिकरित्या दात पांढरे करू शकतात. नियमित काळजी घेऊन आणि योग्य पद्धतीचा अवलंब करून, तुम्ही तुमचे हास्य पुन्हा चमकू शकता.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dental Care : संत्र्याच्या सालानं दात होतील स्वच्छ, कसा करायचा वापर, वाचा सविस्तर
Next Article
इराणने केला महाभयंकर प्रकार, युद्धात मोठी उलथापालथ; होर्मुझमध्ये पेरल्या 'समुद्री सुरुंग', आता एक चूक जगाचा पाया हलवणार
इराणने केला महाभयंकर प्रकार, युद्धात मोठी उलथापालथ; होर्मुझमध्ये पेरल्या 'समुद्री सुरुंग'
  • इराणचा सर्वात मोठा जुगार

  • पेट्रोल-डिझेलसाठी हाहाकार माजणार

  • जागतिक तेल पुरवठा ठप्प होण्याची भीती

View All
advertisement