Skin Care : चेहऱ्यासाठी पपई फेसपॅक, पपईचा गर करेल त्वचा मखमली, या टिप्सचा होईल उपयोग
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
बहुतेक घरात पूर्वी डाळीचं पीठ हमखास वापरलं जायचं. कधीकधी फळं आणि भाज्यांचा वापर केला जातो. यातलंच एक फळ पपई. त्वचेवर पपई वापरल्यानं चेहऱ्यावरच्या मृत त्वचेच्या पेशी निघून जातात. पपईचा फेस पॅक वापरल्यानं त्वचा मऊ होते आणि चेहऱ्यावर चमक येते. आतापर्यंत तुम्हीही पपई वापरली असेल पण त्यात आणखी काही जिन्नस वापरल्यानं त्वचेसाठी आणखी फायदेशीर आहे. पाहूयात याविषयीची माहिती.
मुंबई : त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही काय वापरता ? क्रिम, मॉईश्चरायझर, फेस पॅक हे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. हे पर्याय तुम्ही वापरत असाल तर एक नैसर्गिक स्क्रब करणारं फळ नक्की वापरुन पाहा. ते म्हणजे पपई.
बहुतेक घरात पूर्वी डाळीचं पीठ चेहऱ्यासाठी हमखास वापरलं जायचं. कधीकधी फळं आणि भाज्यांचा वापर केला जातो. यातलंच एक फळ पपई. त्वचेवर पपई वापरल्यानं चेहऱ्यावरच्या मृत त्वचेच्या पेशी निघून जातात. पपईचा फेस पॅक वापरल्यानं त्वचा मऊ होते आणि चेहऱ्यावर चमक येते. आतापर्यंत तुम्हीही पपई वापरली असेल पण त्यात आणखी काही जिन्नस वापरल्यानं त्वचेसाठी आणखी फायदेशीर आहे. पाहूयात याविषयीची माहिती.
advertisement
पपई आणि दही
अर्धा कप कुस्करलेली पपई घ्या आणि त्यात दोन चमचे दही मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर वीस मिनिटं लावा आणि नंतर धुवा. यामुळे चेहऱ्याला थंडावा मिळतो आणि त्वचा चमकदार दिसते.
पपई आणि मध
पपई आणि मधाचा फेसपॅक फेसपॅक बनवण्यासाठी अर्धा कप कुस्करलेली पपई घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि पंधरा ते वीस मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा. यामुळे त्वचेला हायड्रेशन मिळतं, त्वचेचा निस्तेजपणा दूर होतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
advertisement
पपई आणि हळद
एक कप कुस्करलेल्या पपईत अर्धा चमचा हळद मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि दहा ते पंधरा मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यानं त्वचेला अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील मिळतात. त्यामुळे त्वचा एकसारखी टोन होण्यास मदत होते.
advertisement
पपईत एक्सफोलिएटिंग गुणधर्म भरपूर असतात आणि ते चेहऱ्यासाठी नैसर्गिक स्क्रब म्हणून उपयोगी आहेत. पपई चेहऱ्यावर लावल्यानं त्वचा मॉइश्चरायझ आणि मऊ होते. या फेस पॅकमुळे चेहऱ्याला वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील मिळतात, ज्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर होतात. हा फेस पॅक चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन काढून टाकण्यासाठी देखील लावता येतो. पपईच्या फेस पॅकमुळे त्वचेची जळजळ देखील दूर होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 21, 2025 6:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : चेहऱ्यासाठी पपई फेसपॅक, पपईचा गर करेल त्वचा मखमली, या टिप्सचा होईल उपयोग









