Cloves : लवंगांचं पाणी करेल जादू, लपलेले आजार होतील छूमंतर, वाचा सविस्तर

Last Updated:

लवंगांमधे अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. लवंग पाण्यात उकळून पिण्यामुळे त्यातले सर्व गुणधर्म शरीरापर्यंत सहज पोहोचतात. रक्तातील साखरेवर नियंत्रण, वजन कमी करण्यासाठी तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही लवंगांचं पाणी उपयुक्त आहे.

News18
News18
मुंबई : अन्नाची चव वाढवण्याबरोबरच आरोग्य आणि सौंदर्यासाठीही लवंग खूप फायदेशीर आहे. दररोज सकाळी लवंग पाणी प्यायला सुरुवात केली तर शरीरातील अनेक लपलेले आजार बरे होऊ शकतात.
खरंतर, लवंगांमधे अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. लवंग पाण्यात उकळून पिण्यामुळे त्यातले सर्व गुणधर्म शरीरापर्यंत सहज पोहोचतात. रक्तातील साखरेवर नियंत्रण, वजन कमी करण्यासाठी तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही लवंगांचं पाणी उपयुक्त आहे.
advertisement
लवंग पाणी पिण्याचे फायदे
पचनसंस्था मजबूत करण्यासाठी उपयुक्त
लवंग घातलेलं पाणी प्यायल्यानं गॅस, अपचन आणि पोटदुखीसारख्या पोटाच्या समस्या कमी करण्यास मदत होते. त्यातले अँटी-बॅक्टेरियल आणि कार्मिनेटिव्ह गुणधर्म पचनक्रिया सुधारतात.
वजन कमी करण्यास उपयुक्त
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळी रिकाम्या पोटी कोमट लवंग पाणी प्यायला सुरुवात करा. हे खूप प्रभावी आहे. यामुळे चयापचयाचा वेग वाढेल आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगानं होईल.
advertisement
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
लवंगांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. दररोज लवंगाचे पाणी प्यायल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी आणि खोकल्यासारखे आजार शरीरापासून दूर राहतात.
साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त
लवंगांचं पाणी रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित करण्यास मदत होते. साखरेच्या पातळीतील चढउतार यामुळे नियंत्रित होतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी लवंग पाणी फायदेशीर ठरू शकतं. पण मधुमेह असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हे पाणी प्यावं.
advertisement
मुख दुर्गंधी आणि दातदुखी
दातदुखी आणि तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी शतकानुशतकं लवंगांचा वापर केला जातो आहे. लवंगाचं पाणी प्यायल्यानंं मौखिक आरोग्य सुधारतं.
त्वचा आणि केसांसाठी सर्वोत्तम
advertisement
लवंगामधे असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे त्वचा चमकदार होते, त्वचेवरचे डाग दूर होतात. केसांची मजबुती आणि केस गळती रोखण्यास देखील लवंग उपयुक्त आहे.
ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त
दिवसभर थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर सकाळी लवंगांचं पाणी प्यायल्यानं दिवसभर सक्रिय आणि उत्साही वाटेल. लवंगाचं पाणी बनवण्यासाठी तीन-चार लवंगा घ्या आणि त्या रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. कोमट करून देखील पिऊ शकता.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cloves : लवंगांचं पाणी करेल जादू, लपलेले आजार होतील छूमंतर, वाचा सविस्तर
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement