Mosquito Day : डासांना दूर ठेवण्यासाठी घरगुती पाच उपाय, जागतिक डास दिवसानिमित्तानं या टिप्स नक्की वाचा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
डासांमुळे जीवघेणे आजारह होतात. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काही उपाय केले तर उपद्रव कमी होऊन आजार रोखले जाऊ शकतात. या उपायांमधे कोणत्याही रसायनांचा वापर करण्यात आलेला नाही. या नैसर्गिक उपायांची माहिती नक्की वाचवा.
मुंबई : आज World Mosquito Day म्हणजेच जागतिक डास दिन आहे. या दिवशी, डास प्रतिबंधक आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षीची संकल्पना आहे Accelerating the fight against for malaria for more equitable world. मलेरियाला प्रतिबंध करणं, निदान आणि उपचारांबद्दल जनजागृती करणं या सर्वांबद्दल जागरुक राहण्यासाठी ही संकल्पना राबवण्यात येत आहे.
उन्हाळा आणि पावसाळ्यात डासांचा त्रास वाढतो. डास चावल्यानं खाज येणं, जळजळ होणं हा त्रास होतोच पण डासांमुळे जीवघेणे आजारही होतात. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काही उपाय केले तर उपद्रव कमी होऊन आजार रोखले जाऊ शकतात. या उपायांमधे कोणत्याही रसायनांचा वापर करण्यात आलेला नाही.
advertisement
कडुनिंब आणि खोबरेल तेलाचं मिश्रण
कडुनिंबाचं तेल हे डासांना दूर करण्यासाठीचं नैसर्गिक औषध आहे. नारळाच्या तेलात मिसळून हे तेल शरीरावर लावलं तर डास पळून जातात. यासाठी दहा थेंब कडुनिंबाचं तेल, एक चमचा नारळ तेलात मिसळा आणि हात, पाय आणि उघड्या भागांवर लावा.
लिंबू - लवंग
डासांना लिंबू आणि लवंग दोन्हीचा वास आवडत नाही. हा उपाय डासांना खोलीपासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी आहे. एका लिंबाचे दोन तुकडे करा, प्रत्येक तुकड्यात चार - पाच लवंगा चिकटवा. खोलीच्या कोपऱ्यात ठेवा.
advertisement
कापूर
कापुराचा वास डासांना दूर ठेवण्यास मदत करतो. हा उपाय प्राचीन काळापासून वापरला जात आहे. घरात कापूर जाळूनही डासांना दूर ठेवता येतं. रात्री झोपण्यापूर्वी खोलीत एका भांड्यात कापूर लावा. दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा जेणेकरून त्याचा परिणाम टिकून राहील.
advertisement
तुळशीचं रोप
तुळशीच्या सुगंधानं डास दूर पळतात आणि वातावरणही शुद्ध राहतं. तुळशीचं रोप खिडकी किंवा दाराजवळ ठेवा.
लसूण पाणी शिंपडा
डासांना लसणाचा तिखट वास अजिबात आवडत नाही. लसणाचं पाणी खोलीत फवारू शकता. यामुळे डासही दूर होतात. यासाठी लसणाच्या दोन-तीन पाकळ्या बारीक करा. एक कप पाण्यात उकळवा. थंड झाल्यावर ते बाटलीत भरा आणि खोलीत फवारणी करा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 20, 2025 1:23 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mosquito Day : डासांना दूर ठेवण्यासाठी घरगुती पाच उपाय, जागतिक डास दिवसानिमित्तानं या टिप्स नक्की वाचा


