Acidity : अ‍ॅसिडिटीनं होणाऱ्या पोटदुखीवर औषध, डॉक्टरांनी सुचवलेत पाच घरगुती उपाय

Last Updated:

आम्लपित्त झाल्यावर पोटात आम्लपित्तयुक्त वायू तयार होऊ लागतात. यामुळे काहीवेळा पोट दुखतं काही वेळा छातीत जळजळ होते आणि आंबट ढेकराही येतात. काही घरगुती पदार्थ अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. डॉक्टरांनी सांगितलेले घरगुती उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकतात.

News18
News18
मुंबई : अनेकांना आम्लपित्तामुळे उलट्या, पोटदुखीची समस्या जाणवते. आम्लपित्त झाल्यावर पोटात आम्लपित्तयुक्त वायू तयार होऊ लागतात. यामुळे काहीवेळा पोट दुखतं काही वेळा छातीत जळजळ होते आणि आंबट ढेकराही येतात.
मसालेदार पदार्थ किंवा अयोग्य आहारानं अ‍ॅसिडिटी होते. यावेळी अ‍ॅसिडिटीसाठी अनेक औषधं उपलब्ध आहेत. पण यासाठी, डॉ. शालिनी सिंग साळुंके यांनी अ‍ॅसिडिटीसाठी औषधं घेण्याऐवजी काही घरगुती उपाय सांगितलेत.
काही घरगुती पदार्थ अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. डॉक्टरांनी सुचवलेले हे उपाय तुम्ही देखील वापरून पाहू शकता.
advertisement
आल्याचं पाणी - आल्याचं पाणी प्यायल्यानं आम्लपित्त कमी होतं. आल्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि पोटाच्या समस्यांवर त्याचा जलद परिणाम दिसून येतो. आल्याचा एक छोटा तुकडा बारीक करून पाण्यात उकळवा आणि जेवणाच्या अर्धा तास आधी हे पाणी प्या.
बडीशेपेचं पाणी - एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप घाला, ते उकळवा आणि कोमट प्या. जेवणानंतर अर्ध्या तासानं ते पिणं फायदेशीर आहे.
advertisement
केळी - आम्लपित्त कमी करण्यासाठी केळी फायदेशीर आहेत. केळीचा पीएच अल्कधर्मी असतो, यामुळे पोटातील आम्ल कमी होण्यासाठी मदत होते. डॉक्टर म्हणतात की ते सकाळचा सर्वोत्तम नाश्ता आहे.
जिरे पाणी - जिरं हा पोटासाठी सर्वात फायदेशीर मसाला. जिऱ्याचं पाणी प्यायल्यानं आम्लपित्त कमी होते.
advertisement
कॅमोमाइल चहा - कॅमोमाइल फुलांपासून बनवलेला कॅमोमाइल चहा प्यायल्यानं अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो. दररोज जेवणानंतर एक कप कॅमोमाइल चहा प्यायल्यानं अ‍ॅसिडिटीपासून बचाव होतो.
महत्त्वाची टीप नक्की लक्षात ठेवा - रात्रीचं जेवण सात वाजण्यापूर्वी करा. जेवण आणि झोप यात तीन तासांचं अंतर असणं आरोग्यासाठी चांगलं आहे. छातीत जळजळ, आम्लपित्त, पोटात जळजळ किंवा पोट फुगणं यावर हे नैसर्गिक उपाय नक्की परिणामकारक ठरतील. या उपायांचा शरीरावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही अशी हमीही डॉक्टरांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Acidity : अ‍ॅसिडिटीनं होणाऱ्या पोटदुखीवर औषध, डॉक्टरांनी सुचवलेत पाच घरगुती उपाय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement