advertisement

IPL 2026 : परवानगी नसतानाच टाईम टेबलची घोषणा, आयपीएलचा नवा हंगाम 24 तासातच अडचणीत!

Last Updated:

आयपीएल 2026 ला 28 मार्च पासून सुरूवात होणार आहे, पण आयपीएलचं वेळापत्रक जाहीर होत नाही तोच पहिल्या सामन्यावर संकट ओढावलं आहे.

परवानगी नसतानाच टाईम टेबलची घोषणा, आयपीएलचा नवा हंगाम 24 तासातच अडचणीत!
परवानगी नसतानाच टाईम टेबलची घोषणा, आयपीएलचा नवा हंगाम 24 तासातच अडचणीत!
बंगळुरू : आयपीएल 2026 ला 28 मार्च पासून सुरूवात होणार आहे, पण आयपीएलचं वेळापत्रक जाहीर होत नाही तोच पहिल्या सामन्यावर संकट ओढावलं आहे. आयपीएलचा पहिला सामना आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे, पण या सामन्याला कर्नाटक सरकारकडून अजूनही अंतिम मंजुरी मिळालेली नाही.
क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, 13 मार्चला कर्नाटक सरकारकडून नियुक्त करण्यात आलेली तज्ज्ञ समिती स्टेडियमचं निरीक्षण करणार आहे. या निरिक्षणानंतरच चिन्नास्वामी स्टेडियम आयपीएल सामन्यांच्या आयोजनासाठी तयार आहे का नाही? याचा फैसला होईल.
आयपीएल 2025 मध्ये आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, पण यादरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि 11 जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीनंतर स्टेडियमची सुरक्षा आणि इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तसंच चेंगराचेंगरीनंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर कोणत्याही सामन्याचं आयोजन करण्याची परवानगी मिळाली नाही. जस्टीस डी कुन्हा समितीने स्टेडियमच्या सुरक्षेबाबत बरेच सल्ले दिले होते. कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनला 15 मार्चपर्यंत आवश्यक बदल करण्याची वेळही दिली होती.
advertisement

सुरक्षा आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने स्टेडियमची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली, तसंच नवीन एन्ट्री गेटही लावली गेली आणि जुन्या गेट्सची रुंदीही वाढवली गेली. प्रेक्षकांची ये जा सोपी करण्यासाठी नवीन वॉक वे देखील बनवण्यात आले आहेत.
स्टेडियमच्या जवळपास होल्डिंग एरियाही तयार करण्यात आला आहे. इमरजन्सी सेवांसाठी वेगळी एन्ट्री आणि एक्झिट रूटही बनवण्यात आला आहे. बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत मिळून तिकिटिंग सिस्टिममध्येही बदल करण्याची योजना आहे, यातून क्युआर कोड स्कॅनिंग सिस्टिमही लागू करण्यात येणार आहे, ज्यामुळे ऑनलाईन तिकीटसाठी स्टेडियमबाहेर लागणारी गर्दी कमी केली जाईल.
advertisement

आयपीएलमध्ये आरसीबीच्या किती होम मॅच?

12 मार्चला बीसीसीआयने आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा केली. यात मोसमाचा पहिलाच सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. याशिवाय 5 एप्रिलला आरसीबी आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातली मॅचही याच स्टेडियममध्ये होणार आहे.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आरसीबी 5 मॅच त्यांचं होमग्राऊंड असलेल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे, तर दोन होम मॅच रायपूरच्या स्टेडियममध्ये आयोजित केल्या जातील. आतापर्यंत आयपीएलचं पहिल्या टप्प्याचं वेळापत्रकच जाहीर करण्यात आलं आहे. राज्यांमधल्या निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्यानंतर आयपीएलचं उर्वरित वेळापत्रक जाहीर केलं जाईल.
advertisement
13 मार्चला निरीक्षण झाल्यानंतरच आयपीएल 2026 चे सामने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार का नाही? हे निश्चित होईल. चिन्नास्वामी स्टेडियमवर मॅचचं आयोजन करायला परवानगी मिळाली नाही, तर आरसीबीला दुसऱ्या स्टेडियमवर त्यांच्या होम मॅच खेळाव्या लागतील.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : परवानगी नसतानाच टाईम टेबलची घोषणा, आयपीएलचा नवा हंगाम 24 तासातच अडचणीत!
Next Article
advertisement
Tips And Tricks : फेव्हिक्विकने बोटं चिकटली असतील तर घाबरू नका, 'या' ट्रिकने क्षणांत वेगळी होतील
फेव्हिक्विकने बोटं चिकटली असतील तर घाबरू नका, 'या' ट्रिकने क्षणांत वेगळी होतील
View All
advertisement