Hair Loss : केस गळतीवर नैसर्गिक उपचार, वाचा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला

Last Updated:

तज्ज्ञांच्या मते, केस गळतीच्या पन्नाल टक्के प्रकरणांत डीएचटी हार्मोन हे एक प्रमुख कारण आहे. हे हार्मोन हळूहळू केसांच्या मुळांचा भाग कमकुवत करतं, ज्यामुळे केस पातळ होतात आणि गळू लागतात. बाजारात DHT ब्लॉकरच्या नावानं अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत पण ही समस्या नैसर्गिक पद्धतीनं देखील नियंत्रित करू शकता.

News18
News18
मुंबई : केस गळण्याची समस्या आता फक्त उतारवयात नाही कुठल्याही वयोगटात जाणवायला लागली आहे. अनेकांच्या डोक्यावरील केस हळूहळू कमी होऊन टाळू दिसायला लागला आहे. यावर उपचार म्हणून, अनेकदा महागडे शॅम्पू, सीरम किंवा औषधं वापरली जातात, पण त्याचे परिणाम होतीलच असं नाही. केस गळतीचा त्रास थांबवण्यासाठी आणि जाड केस परत मिळवण्यासाठी एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय सांगणारी ही माहिती.
तज्ज्ञांच्या मते, केस गळतीच्या पन्नाल टक्के प्रकरणांत डीएचटी हार्मोन हे एक प्रमुख कारण आहे. हे हार्मोन हळूहळू केसांच्या मुळांचा भाग कमकुवत करतं, ज्यामुळे केस पातळ होतात आणि गळू लागतात.
बाजारात DHT ब्लॉकरच्या नावानं अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत पण ही समस्या नैसर्गिक पद्धतीनं देखील नियंत्रित करू शकता.
advertisement
DHT नियंत्रित करण्यासाठी उपाय -
यासाठी हळद हा प्रभावी उपाय आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते, हळदीतलं कर्क्यूमिन एक नैसर्गिक डीएचटी ब्लॉकर आहे. हे घटक DHT संप्रेरक थांबवण्याचं काम करतं असं अनेक संशोधनात आढळून आलं आहे. याच्या  नियमित वापरानं केस गळण्याचं प्रमाण कमी होतं आणि केसांची ताकद वाढते.
advertisement
हळद कशी वापरावी?
केसांसाठी हळद दोन प्रकारे वापरू शकता. अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी पावडर एक ग्लास कोमट पाण्यात घाला आणि रिकाम्या पोटी प्या. काळी मिरी हळदीचा प्रभाव आणखी वाढवते. याशिवाय, हळद आणि कोरफड जेल मिसळून टाळूवर लावू शकता. यामुळे सूज कमी होईल आणि केस गळतीपासून आराम मिळेल. केस हळूहळू गळतायत असं जाणवत असेल, तर हळदीचा हा सोपा उपाय वापरून पाहू शकता. हा आयुर्वेदिक उपाय डॉ. सलीम झैदी यांनी सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. एक महत्त्वाची गोष्ट - त्वचेवर कोणताही उपाय करण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Loss : केस गळतीवर नैसर्गिक उपचार, वाचा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement