advertisement

Navi Mumbai : प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेली...; कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडताच पाहावे लागले भयंकर दृश्य

Last Updated:

Navi Mumbai Crime News : प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणीसोबत अशी काही भयंकर घटना घडते त्याने संपूर्ण परिसरच हादरुन निघतो. सध्या या घडलेल्या घटनेचा पोलिस तपास सुरु आहे.

ऐरोलीतील हॉटेलमध्ये २४ वर्षीय तरुणीच्या प्रियकराने लग्नाबाबत टाळाटाळ केल्याने तणावातून टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता.
ऐरोलीतील हॉटेलमध्ये २४ वर्षीय तरुणीच्या प्रियकराने लग्नाबाबत टाळाटाळ केल्याने तणावातून टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता.
नवी मुंबई : प्रियकराने लग्नाबाबत वारंवार टाळाटाळ केल्याने मानसिक तणावात येऊन 24 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ऐरोलीमध्ये घडलेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरु केलेला आहे.
वाचा नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते त्यावरुन ती गेल्या काही दिवसांपासून ती वैयक्तिक कारणांमुळे टेन्शनमध्ये होती आणि त्यातही तिच्या प्रियकरासोबत वारंवार लग्नाबाबत चर्चा करुनही त्याच्याकडून लग्नाबाबत ठोस निर्णय घेतला जात नसल्याने ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झालेली होती.
प्रतिसाद नाही, शेवटी दरवाजा तोडला
घटनेदिवशी म्हणजे बुधवारी ती प्रियकरासोबत ऐरोली सेक्टर 1 येथील एका हॉटेलमध्ये गेली आणि पण बराच वेळ झालं ती दरवाजा उघडत नसल्याचे हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला. शेवटी त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असती तरुणी गळफास घेतलेली आढळून आली.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तिचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी पाठवला. प्राथमिक तपासात तरुणीने प्रेमसंबंधातून झालेल्या तणावामुळे हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची शक्यता घेण्यात येत आहे मात्र या संबंधित तरुणीच्या प्रियकराची चौकशी सुरु असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेली...; कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडताच पाहावे लागले भयंकर दृश्य
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement