advertisement

Pune Crime : चुकीला माफी नाही! हडपसरमधील गँगस्टर टिपू पठाण टोळीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Last Updated:

Pune Crime News : पुण्यातील सय्यदनगर भागात दहशत माजवून हॉटेल चालकाकडे खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी बंदोबस्त केला आहे.

Pune Crime Police MCOCA Action On Tipu Pathan
Pune Crime Police MCOCA Action On Tipu Pathan
Pune Crime News : पुणे शहर आणि परिसरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सराईत गुंडांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारांवर वारंवार मोक्का लावूनही तो पुन्हा सक्रिय होत असल्याने आता पोलीस अधिक कठोर पावले उचलत आहेत. अशातच आता पुण्यातील हडपसर भागातील टोळीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील सय्यदनगर भागात दहशत माजवून हॉटेल चालकाकडे खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी बंदोबस्त केला आहे.

MCOCA अंतर्गत कारवाई

सराईत गुन्हेगार रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण याच्यासह त्याच्या 8 साथीदारांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (MCOCA) कारवाई करण्यात आली आहे. टिपू पठाणवर झालेली ही तिसरी मोक्काची कारवाई असल्याने गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून, पुणे पोलिसांनी गुंडांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याचं यातून स्पष्ट झाले आहे.
advertisement

महिन्याला 5 हजार रुपयांची खंडणी

या घटनेची सुरुवात 16 फेब्रुवारी रोजी झाली, जेव्हा आरोपी टिपू पठाण आणि त्याच्या टोळीने फिर्यादी हॉटेल चालकाला सय्यदनगर येथील 'ख्वाजा मंजिल' या आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले. तिथे आरोपींनी फिर्यादीवर दबाव टाकला की, त्यांच्या भागीदारीतील दुकानातूनच मटण खरेदी करावं लागेल. इतकेच नाही तर, परिसरात हॉटेल शांततेत चालवायचे असेल, तर दर महिन्याला 5 हजार रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी आरोपींनी दिली. या धमकीमुळे हॉटेल व्यावसायिक प्रचंड दहशतीखाली होता.
advertisement

पोलिसांना गुंगारा देत होता

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच काळेपडळ पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी फैजान उर्फ पच्चीस शेख याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फैजान हा टोळीतील सक्रिय सदस्य असून तो गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला अटक केल्यामुळे आता या टोळीच्या इतर काळ्या कारनाम्यांची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस सध्या या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : चुकीला माफी नाही! हडपसरमधील गँगस्टर टिपू पठाण टोळीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement