Pune Crime : '25 लाख दे नाहीतर...', हडपसरच्या टिपू पठाण टोळीवर पुणे पोलिसांची धडक कारवाई!

Last Updated:

Pune Gang War : जागा सोडायची असेल तर 25 लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्यांनी केली. पैसे दिले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी महिलेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

MCOCA action against Tipu Pathan gang
MCOCA action against Tipu Pathan gang
Pune Crime News : पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. हडपसर परिसरातील काही भागात सातत्याने दहशत माजवणाऱ्या आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर वचक बसावा, यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर पाऊल उचलले आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या एका सराईत टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी आता थेट एका विशेष आणि कडक कायद्याचा वापर करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

25 लाख रुपये द्यावे लागतील नाहीतर...

हडपसरमधील सय्यदनगर आणि काळेपडळ परिसरात स्वतःची भाईगिरी गाजवणाऱ्या रिझवान ऊर्फ टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने सय्यदनगरमधील एका जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा केला होता आणि तिथे पत्र्याचे शेड उभारले होते. जेव्हा तक्रारदार महिलेने आपली जागा रिकामी करण्यास सांगितले, तेव्हा या गुंडांनी तिला धमकावण्यास सुरुवात केली. जागा सोडायची असेल तर 25 लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्यांनी केली. पैसे दिले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी महिलेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
advertisement

25 गंभीर गुन्हे दाखल

टिपू पठाण हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या गुन्हेगारी कारवायांची यादी मोठी आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, दहशत माजवणे आणि खंडणी उकळणे यांसारखे तब्बल 25 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची ही वाढती गुंडागर्दी लक्षात घेऊन काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांनी या संदर्भातील प्रस्ताव पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्याकडे पाठविला होता.
advertisement

'MCOCA' कारवाई करण्याचे आदेश

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी या प्रस्तावाची सखोल पडताळणी केली. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या कुख्यात टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत म्हणजेच 'MCOCA' कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर मोक्का लावल्यामुळे परिसरातील इतर गुन्हेगारांचेही धाबे दणाणले आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : '25 लाख दे नाहीतर...', हडपसरच्या टिपू पठाण टोळीवर पुणे पोलिसांची धडक कारवाई!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement