थाटामाटात लग्न; काही दिवसातच प्रेग्नंट अन् वर्षभरातच दोघांमध्ये खटके; पुण्यातील जोडप्याची कोर्टात धाव, प्रकरणात मोठा निकाल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मुलीचे वडील मोठे व्यावसायिक असल्यामुळे थाटामाटात हा विवाहसोहळा झाला. लग्नानंचर काही दिवसात माधुरी गरोदर राहिली.
पुणे : घटस्फोटाच्या लढाईत अनेकदा कायदेशीर चक्रव्यूहात अडकल्यामुळे महिलांना न्याय मिळणं कठीण होतं. मात्र, एका विवाहितेने कौटुंबिक न्यायालयात शेवटच्या टप्प्यापर्यंत लढा देत आपला हक्क मिळवला आहे. तब्बल ६३ लाख ६४ हजार रुपयांची पोटगी आणि मुलीचा ताबा आपल्याकडे राखण्यात या विवाहितेला यश आले आहे.
काय होते प्रकरण?
माधुरी आणि अक्षय (नावे बदललेली) यांचा विवाह २९ जानेवारी २०१७ रोजी थाटामाटात झाला होता. मुलीचे वडील मोठे व्यावसायिक असल्यामुळे थाटामाटात हा विवाहसोहळा झाला. लग्नानंचर काही दिवसात माधुरी गरोदर राहिली. मात्र, काही काळानंतर पती-पत्नीमध्ये खटके उडू लागले आणि पत्नी माहेरी गेली. तिला मुलगी झाली. पण बाळाच्या येण्यानंही काही बदललं नाही आणि पतीने २०२० मध्ये घटस्फोटाचा दावा दाखल केला. माधुरी यांच्याकडे लहान मुलगी असल्याने, त्यांना न्यायालयात वारंवार हजर राहणे अशक्य झाले होते. कौटुंबिक परिस्थिती आणि कोरोना काळातील अडचणींमुळे हा खटला बराच काळ प्रलंबित राहिला.
advertisement
२०२५ मध्ये माधुरी यांनी अॅड. नीता भवर यांच्या मदतीने पुन्हा कायदेशीर लढाईला सुरुवात केली. अॅड. भवर यांनी पतीची कडक उलटतपासणी घेतली, ज्यामुळे प्रकरणाची गंभीरता वाढली. त्यानंतर पतीच्या बाजूने तडजोडीचा प्रस्ताव मांडण्यात आला. अखेर, न्यायाधीश के. व्ही. ठाकूर यांच्यासमोर दोन्ही पक्षांत मध्यस्थी झाली.
पतीने माधुरी यांना कायमस्वरूपी पोटगी म्हणून ६३ लाख ६४ हजार रुपये देण्याचे मान्य केले. यामध्ये त्यांचे स्त्रीधन, लग्नातील सामानाची किंमत आणि पोटगीचा समावेश आहे. या तडजोडीनंतर न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला असून, मुलीचा ताबा माधुरी यांच्याकडेच कायम ठेवला आहे. शेवटच्या टप्प्यातही मिळालेला हा न्याय अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 10:28 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
थाटामाटात लग्न; काही दिवसातच प्रेग्नंट अन् वर्षभरातच दोघांमध्ये खटके; पुण्यातील जोडप्याची कोर्टात धाव, प्रकरणात मोठा निकाल








