Mumbai : मुंबईतला मोठा अंडरग्राउंड टनेल, झटपट प्रवासाचा कसा असेल मार्ग, कुठून कुठपर्यंत जाणार?
Last Updated:
Mumbai News : मुंबईकरांनो येत्या काही वर्षात शहरातील प्रवास अतिशय जलद होणार आहे. नेमका कोणता प्रकल्प मुंबई शहरात होणार आहे त्याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
मुंबई : मुंबई शहराचा विकास होत असताना अनेक नवे रस्ते प्रकल्प सुरु आहे. या सर्व प्रकल्पांमुळे मुंबई शहरातील वाहतूककोंडी सुटून प्रवास सोपा होणार आहे, सध्या मुंबई शहराअंतर्गत सर्वात रुंद असा बोगदा तयार करण्यात येणार आहे. हा बोगदा कुठे असेल आणि शहरातील कोणत्या भागांपर्यंत जाणे भविष्यात सोयीस्कर होणार आहे.
कुठे खणला जाणार मुंबईचा सर्वात मोठा बोगदा?
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांर्गत असलेल्या दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात हे जुळे बोगदे बांधण्यात येणार आहेत. मात्र तो चित्रनगरी ते पूर्व उपनगरामध्ये मुलुंड येथे खिंडीपाडापर्यंत बांधण्यात येणार आहे, यासाठी दोन टीबीएम यंत्र वापरण्यात येणार असून हे सर्वात रुंद बोगदे असणार आहेत.
मुंबई शहरातील मुंबई सागरी किनारा तसेच ठाणे-बोरिवली येथेही भूमिगत बोगदे करण्यात येत आहेत मात्र यापेक्षा ही या नव्या बोगद्यांचा व्यास मोठा आहे शिवाय या बोगद्यांसाठी खणण्यासाठी वापरण्यात येणार यंत्रही सर्वात मोठे आहे.
advertisement
कोणत्या मार्गांना होणार फायदा?
मुंबई महानगरपालिकेने पश्चिम आणि पू्र्व उपनगरांना रस्तेमार्गे जोडण्यासाठी तब्बल 12.20 किलोमीटर लांबीचा गोरेगाव- मुलुंड जोड मार्ग प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत सर्वात मोठे बोगदे हे बांधण्यात येणार आहेत.
प्रकल्पाच्या कामाची सध्याची स्थिती काय?
सध्या या मार्गावरील बोगदे खणण्यासाठी टीबीएमचे सुटे भाग प्रकल्पाच्या ठिकाणी आले आहेत आणि त्याचे सुट्टे भाग जमिनीखाली उतरवण्याच्या कामालाही सुरुवात केली आहे. सुरुवातीस हे सु्ट्टे भाग जमिनीखाली जोडणार आणि मग यंत्राद्वारे प्रत्यक्षात जून महिन्यापासून बोगदा खणायला सुरुवात करणार आहेत.
advertisement
या योजनेत तीन महत्त्वाच्या मार्गिका
शहरात होणारे हे भुमिगत जुळे बोगदे एकमेकांना समांतर असणार असून प्रत्येक 4.70 किलोमीटरचे आहे तर या समांतर जु्ळ्या बोगद्यांचा व्यास हा 14.20 मीटर असेल. विशेष म्हणजे हे बोगदे संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या डोंगराच्या खालून जाणार आहे त्यात ते 13 मीटर असेल आणि या समांतर बोगद्यांमध्ये प्रत्येरी तीन मार्गिका पण असणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 10:11 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : मुंबईतला मोठा अंडरग्राउंड टनेल, झटपट प्रवासाचा कसा असेल मार्ग, कुठून कुठपर्यंत जाणार?








