Papmochani Ekadashi 2026: आज घरात 'या' गोष्टी बिलकूल करू नयेत; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलेल्या एकादशी टिप्स
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
15 मार्च 2026 रोजी फाल्गुन कृष्ण पक्षातील अत्यंत फळदायी मानली जाणारी 'पापमोचनी एकादशी' साजरी होत आहे. नावाप्रमाणेच ही एकादशी मनुष्याचे जन्मभराचे पाप नष्ट करणारी आणि मोक्ष मिळवून देणारी मानली जाते. या विशेष पर्वाचे महत्त्व सांगताना...
मुंबई : आज एकादशीचा दिवस आहे. 15 मार्च 2026 रोजी फाल्गुन कृष्ण पक्षातील अत्यंत फळदायी मानली जाणारी 'पापमोचनी एकादशी' साजरी होत आहे. नावाप्रमाणेच ही एकादशी मनुष्याचे जन्मभराचे पाप नष्ट करणारी आणि मोक्ष मिळवून देणारी मानली जाते. या विशेष पर्वाचे महत्त्व सांगताना प्रसिद्ध राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी भाविकांसाठी काही महत्त्वाचे नियम आणि पथ्ये सांगितली आहेत.
शरद उपाध्ये यांच्या मार्गदर्शनानुसार, आजच्या दिवशी काही गोष्टी कटाक्षाने टाळणे गरजेचे आहे. आज विनाकारण तुळशीची पाने तोडू नयेत, कारण तुळशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तसेच, एकादशीच्या दिवशी घरात तांदूळ शिजवू नयेत आणि भात खाणे पूर्णपणे वर्ज्य करावे, असा शास्त्राचा संकेत त्यांनी दिला आहे. जे भाविक शारीरिक कारणांमुळे पूर्ण उपवास करू शकत नाहीत, त्यांनी अल्प उपाहार करावा, मात्र अन्नाबाबत संयम पाळावा.
advertisement
केवळ आहारावरच नव्हे, तर आपल्या वाणीवर आणि वर्तनावरही आज ताबा असणे आवश्यक आहे. शरद उपाध्ये सांगतात की, आज प्रत्येकाने मितभाषी असावे. मनावर संयम ठेवून कोणाबद्दलही अपशब्द वापरणे, मनात द्वेष किंवा मत्सर ठेवणे टाळावे. हा दिवस आध्यात्मिक चिंतनाचा असल्याने दुपारी झोपणे टाळून आपले मन ईश्वरी नामस्मरणात गुंतवावे.
advertisement
आजच्या दिवशी 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:' या मंत्राचा सतत जप करणे अत्यंत फलदायी ठरेल. यासोबतच सूर्यस्तुती, महालक्ष्मी अष्टक आणि दुर्गास्तोत्र पठण केल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. पापमोचनी एकादशीचा हा दुर्मिळ योग साधून भक्ती आणि संयमाचा मार्ग स्वीकारल्यास मनाला शांती लाभते आणि जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत होते, असे राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी नमूद केले आहे.
advertisement
पापमोचनी एकादशी शुभ योग - आज एकादशीच्या दिवशी द्विपुष्कर योग आणि शुक्र उच्च राशीत असल्याने मालव्य राजयोग तयार होत आहे. तसेच मीन राशीत शुक्र, शनी आणि सूर्य एकत्र असल्याने शुक्रादित्य योग आणि त्रिग्रही योग तयार होत आहेत. या शुभ लोकांमुळे आजच्या तिथीचे महत्त्व खूप वाढले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 10:47 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Papmochani Ekadashi 2026: आज घरात 'या' गोष्टी बिलकूल करू नयेत; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलेल्या एकादशी टिप्स









