Platelets : प्लेटलेट्स म्हणजे काय रे भाऊ ? निरोगी व्यक्तीत किती प्लेटलेटस गरजेच्या ? जाणून घ्या
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
प्लेटलेट्स म्हणजे काय ? आणि प्लेटलेट्सची संख्या कमी झाली तर धोका वाढला असं का मानलं जातं. निरोगी व्यक्तीच्या शरीरात किती प्लेटलेट्स असायला हवेत हे जाणून घ्या.
मुंबई : तुमच्या शरीरात जितक्या प्लेटलेटस् जास्त तितकी तुमची तब्येत श्रीमंत. कारण प्लेटलेट्स योग्य मर्यादेत असतील तर आजाराशी लढण्याची ताकद कायम राहते. प्लेटलेट्स म्हणजे आपल्या रक्तात असलेल्या खूप लहान पेशी. शरीरात रक्त गोठण्याचं खूप महत्त्वाचं काम प्लेटलेटसमुळे होतं. दुखापत होते तेव्हा प्लेटलेट्समुळे रक्तस्त्राव थांबतो आणि जखम भरण्यास मदत होते.
advertisement
पावसाळ्यात हमखास आढळणारे आजार म्हणजे डेंग्यू, मलेरिया. डेंग्यू म्हटलं की भरपूर ताप आणि प्लेटलेट्सचे चढउतार. डास चावल्यामुळे होणारा हा आजार काळजी घेतली नाही तर धोकादायक ठरू शकतो. यात सर्वात जास्त लक्ष प्लेटलेट्सकडे असतं. कारण, डेंग्यू झाल्यावर शरीरात सर्वात जास्त असंतुलन निर्माण करणारी गोष्ट म्हणजे प्लेटलेट्स.
प्लेटलेट्स म्हणजे काय ? आणि प्लेटलेट्सची संख्या कमी झाली तर धोका वाढला असं का मानलं जातं. निरोगी व्यक्तीच्या शरीरात किती प्लेटलेट्स असायला हवेत हे जाणून घ्या.
advertisement
निरोगी व्यक्तीमध्ये किती प्लेटलेट्स असतात ?
सामान्य आणि निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्लेटलेट्सची संख्या असते दीड लाख ते साडे चार लाख प्रति मायक्रोलीटर. एखाद्याचा प्लेटलेट काउंट या मर्यादेत असेल तर ते सामान्य म्हणजे नॉर्मल मानलं जातं. पण, ही संख्या यापेक्षा कमी झाली तर शरीरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement
डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स का कमी होतात?
डास चावल्यामुळे डेंग्यू होतो. डेंग्यूचा विषाणू शरीरात प्रवेश करतो तेव्हा तो प्लेटलेट्स नष्ट करण्यास सुरुवात करतो. डेंग्यू विषाणू हाडांच्या मज्जावर म्हणजेच हाडातील रक्त तयार होणाऱ्या भागावर परिणाम करतो, ज्यामुळे नवीन प्लेटलेट्सचं उत्पादन कमी होतं. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून प्लेटलेट्सना शत्रू मानते आणि त्यांचा नाश करण्यास सुरुवात करते. यामुळे डेंग्यूत प्लेटलेट्सची संख्या झपाट्यानं कमी होते.
advertisement
प्लेटलेट्सची कमतरता कधी धोकादायक मानली जाते?
प्लेटलेट्सची संख्या एक लाखाच्या खाली गेली तर डॉक्टर सतर्क होतात. पण ही संख्या वीस हजाराच्या खाली गेली तर ती स्थिती गंभीर मानली जाते.
प्लेटलेट्स कमी असतील तर ही लक्षणं दिसू शकतात -
advertisement
नाक किंवा हिरड्यांमधून रक्त येणं
त्वचेवर लाल किंवा निळे डाग
मूत्र किंवा मलामधे रक्त येणं
डोकेदुखी आणि चक्कर येणं
डेंग्यूतून बरं होण्यासाठी किती वेळ लागतो?
डेंग्यूपासून बरं होण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन आठवडे लागतात. प्लेटलेट्स खूप कमी असतील तर बरं होण्यास जास्त वेळ लागू शकतो. डॉक्टरांच्या देखरेखीखाली, योग्य आहार आणि विश्रांतीमुळे प्लेटलेट्स हळूहळू वाढतात.
advertisement
प्लेटलेट्स वाढवण्यासाठी घरगुती उपाय
पपईच्या पानांचा रस
डाळिंब, किवी आणि नारळ पाणी
संत्र्यासारखी व्हिटॅमिन सी असलेली फळं
भरपूर पाणी प्या आणि विश्रांती घ्या
डेंग्यू हा एक गंभीर आजार आहे, पण वेळेवर उपचार आणि काळजी घेतल्यास तो रोखता येतो. प्लेटलेट्सच्या संख्येवर लक्ष ठेवणं खूप महत्वाचे आहे, कारण यामुळे शरीराला रक्तस्त्राव होण्यापासून संरक्षण मिळते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 21, 2025 8:02 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Platelets : प्लेटलेट्स म्हणजे काय रे भाऊ ? निरोगी व्यक्तीत किती प्लेटलेटस गरजेच्या ? जाणून घ्या


