Tadasana : रक्ताभिसरण, पचनसंसथेसाठी अत्यंत उपयुक्त आसन, वाचा ताडासनाचे फायदे
- Published by:Renuka Joshi
 
Last Updated:
ताडासन ज्याला 'पर्वत मुद्रा' असंही म्हणतात. या आसनामुळे शारीरिक संतुलन आणि स्थैर्य वाढतं. यामुळे मानसिक शक्ती आणि आत्मविश्वास देखील वाढतो. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मते, ताडासन हे आसन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
मुंबई : जीवनशैलीतले बदल, कामाचा ताण आणि अनियमित दिनचर्या या तिन्ही गोष्टी अनेक समस्यांचं मूळ कारण होतात. योगामध्ये बहुतेक समस्यांवर उपाय आहे. यातलं एक उपयुक्त योगासन म्हणजे ताडासन. ज्याला 'पर्वत मुद्रा' असंही म्हणतात. या आसनामुळे शारीरिक संतुलन आणि स्थैर्य वाढतं. यामुळे मानसिक शक्ती आणि आत्मविश्वास देखील वाढतो.
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मते, ताडासन हे आसन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
ताडासन करण्यासाठी सरळ उभं रहा आणि पाय एकमेकांपासून दोन इंच अंतरावर ठेवा. हातांची बोटं एकमेकांत गुंतवा आणि मनगटं बाहेरच्या दिशेनं वाकवा. श्वास घेताना, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत डोक्याच्या वर उचला. नंतर, टाचा जमिनीच्या वर उचला आणि पायाच्या बोटांवर संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा आणि दहा-पंधरा सेकंद या स्थितीत रहा.
advertisement
ताडासनामुळे पाठीचा कणा मजबूत होतो आणि स्नायूंना लवचिकता येते. आयुष मंत्रालयाच्या मते, ताडासनानं रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे पचनसंस्था मजबूत होते.
यामुळे ताण कमी होण्यास आणि मानसिक एकाग्रता वाढवण्यास देखील मदत होते. नियमित सरावानं पाय, पाठ आणि खांद्याचे स्नायू बळकट होतात.
advertisement
या योगासनामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतं. पण हे करताना काही बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कमी रक्तदाब किंवा चक्कर येणाऱ्यांनी पायांवर संतुलन राखताना सावधगिरी बाळगली पाहिजे.
गर्भवती महिलांनी हे आसन योगा प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली करावं. जास्त वेळ या आसनात राहिल्यानं पायांवर दबाव येऊ शकतो, म्हणून शरीराच्या क्षमतेनुसार सराव करा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 22, 2025 6:51 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tadasana : रक्ताभिसरण, पचनसंसथेसाठी अत्यंत उपयुक्त आसन, वाचा ताडासनाचे फायदे


