Brain : सात सोप्या टिप्सनं मेंदू होईल तंदुरुस्त, स्मरणासंबंधित आजारांचा धोका होईल कमी
- Published by:Renuka Joshi
 
Last Updated:
हिप्पोकॅम्पस लहान किंवा कमकुवत झाला तर स्मरणशक्ती कमी होऊ लागते आणि अल्झायमरसारख्या आजारांचा धोका वाढतो असं संशोधनातून दिसून आलं आहे.
मुंबई : आठवण म्हणजे कोणासाठीही मनाच्या जवळची गोष्ट पण हा आठवणींचा साठा करतो मेंदू. एखादी गोष्ट लक्षात ठेवणं, नवीन गोष्ट शिकणं हे आव्हानात्मक काम मेंदूचं. आपल्या मेंदूचा एक छोटासा भाग हिप्पोकॅम्पस हे काम पार पाडतो. यामुळे लहान आठवणी मेंदूमधे दीर्घकाळ साठवून ठेवल्या जातात. हिप्पोकॅम्पस लहान किंवा कमकुवत झाला तर स्मरणशक्ती कमी होऊ लागते आणि अल्झायमरसारख्या आजारांचा धोका वाढतो असं संशोधनातून दिसून आलं आहे.
advertisement
यासाठी चांगली गोष्ट म्हणजे आपण हिप्पोकॅम्पसला बळकट करू शकतो, व्यायामानं जसे स्नायू बळकट होतात त्याप्रमाणे मेंदूसाठी काही सवयी बदलाव्या लागतील आणि तसं केलं तर तीस दिवसांत फरक दिसेल.
भूमध्यसागरीय आहार म्हणजे Mediterranean  Diet चं महत्त्व -
advertisement
भूमध्यसागरीय आहार, ज्यात भरपूर भाज्या, फळं, संपूर्ण धान्य, ऑलिव्ह ऑइल, मासे आणि काजू यांचा समावेश आहे, यामुळे मेंदूला पोषण मिळतं. या पदार्थात अँटिऑक्सिडंट्स आणि निरोगी चरबी असते, यामुळे सूज कमी होते आणि मेंदूच्या पेशींना बळकटी मिळते. ओमेगा-3 फॅटी एसिड्स, विशेषतः, हिप्पोकॅम्पसचा आकार वाढवण्यासाठी मदत करतात. दररोज खाऊ शकत नसलात तरी आठवड्यातून काही वेळा हे अन्नपदार्थ खाण्याचा प्रयत्न करा.
advertisement
सकाळचा सूर्यप्रकाश अंगावर घ्या -
सकाळच्या सूर्यप्रकाशात व्हिटॅमिन डी प्रदान करत नाही तर मेंदूचे घड्याळ म्हणजेच सर्कॅडियन लय देखील राखतो. व्हिटॅमिन डीची कमतरता स्मरणशक्ती आणि मूड दोन्हीवर परिणाम करते. दररोज पंधरा-वीस मिनिटं सकाळी उन्हात बसल्यानं झोप चांगली लागते आणि स्मरणशक्ती मजबूत होते.
गाढ आणि शांत झोपेला प्राधान्य द्या -
प्रौढांना दररोज सात-नऊ तासांची झोप आवश्यक असते. झोपेच्या खोल टप्प्यात, मेंदू दिवसभरातील घटना पुन्हा सादर करतो आणि त्या दीर्घकालीन स्मृतीत साठवतो. झोपेत व्यत्यय आला तर स्मृती विखुरलेली दिसते. झोपण्याच्या चांगल्या सवयींमुळे यात सुधारणा होते. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करा, एका निश्चित वेळी झोपायची सवय लावा, खोलीत अंधार करुन मग झोपा, याचा परिणाम नक्की दिसून येईल.
advertisement
पोट निरोगी मन निरोगी -
आपल्या पोटातील निरोगी जीवाणू थेट मेंदूवर परिणाम करतात. हे जीवाणू सेरोटोनिन आणि GABA सारखी रसायनं तयार करतात, यामुळे मेंदू शांत राहतो आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण राहते. दही, घरगुती लोणचं आणि फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्यानं आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि हिप्पोकॅम्पस मजबूत होतो.
advertisement
संवाद साधा आणि नातेसंबंध टिकवून ठेवा -
सामाजिक संबंध केवळ हृदयासाठीच नव्हे तर मेंदूसाठी देखील महत्त्वाचे आहेत. हिप्पोकॅम्पसला भावनिक उत्तेजन महत्त्वाचं आहे. प्रेम, हास्य आणि संभाषणात याचं गुपित दडलंय. मित्रांना भेटणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं यामुळेही स्मरणशक्तीसाठी चांगली राहते.
ताणतणावाचं व्यवस्थापन शिका -
जास्त ताणामुळे मेंदूच्या पेशींचं नुकसान होतं. ध्यान, खोल श्वास घेणं किंवा संगीत ऐकणं यामुळे ताण कमी होतो. दिवसातून फक्त दहा मिनिटं शांत बसल्यानं कोर्टिसोल हार्मोन कमी होतो आणि मेंदूला दुरुस्तीसाठी वेळ मिळतो.
advertisement
शरीराची हालचाल करा, मेंदूला चालना द्या
व्यायाम हे केवळ तंदुरुस्तीसाठीच नाही तर मेंदूसाठीही वरदान आहे. चालणं किंवा जॉगिंगमुळे शरीर BDNF नावाचं प्रथिन रिलीज करतं ज्याला मेंदूसाठीचं खत म्हटलं जातं. यामुळे हिप्पोकॅम्पसचा विस्तार वाढतो आणि बळकटी मिळते. यासाठी आठवड्यात जास्त मेहनत करण्याची गरज नाही, फक्त तीस मिनिटं चालणं किंवा दररोज कोणताही हलका व्यायाम पुरेसा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2025 7:54 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Brain :  सात सोप्या टिप्सनं मेंदू होईल तंदुरुस्त, स्मरणासंबंधित आजारांचा धोका होईल कमी


