Virar News: डॉक्टर नाही, पदवी नाही, तरीही चालवत होते 'स्पर्म बँक'! विरारमधील पद्मीबाई टॉवरमधील काळेधंदे उघड
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
विरारमध्ये कोणत्याही वैद्यकीय शैक्षणिक पात्रतेची नोंदणी नसताना आणि अधिकृत परवानगी नसतानाही शुक्राणुंची साठवणूक करणाऱ्या एजन्सीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई- विरार: बदलापूरामध्ये स्री बीजाच्या अवैध विक्रीचं रॅकेट उघड झाल्यानंतर आता वैद्यकीय आरोग्य विभाग महाराष्ट्रातल्या अनेक प्रमुख शहरांमध्ये धाड टाकत आहेत. विरारमध्ये बेकायदा शुक्राणुंची साठवणूक करणाऱ्या, कोणत्याही वैद्यकीय शैक्षणिक पात्रतेची नोंदणी नसताना आणि अधिकृत परवानगी नसतानाही शुक्राणुंची विक्री करणाऱ्या एजन्सीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरारमध्ये बेकायदेशीर शुक्राणुंची साठवणूक करणाऱ्या एजन्सीचे सर्व काळेधंदे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने उजेडात आणले आहेत. विरारमधील पद्मीबाई टॉवरमधील जीवदानी सायंटिफिक कंपनीवर कारवाई करण्यात आली असून या घटनेमुळे वसई- विरार शहर हादरले आहे.
कोणतीही नोंदणी नसताना आणि वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नसताना बेकायदेशीर पद्धतीने विरारमधील जीवदानी सायंटिफिक कंपनीच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. विरारच्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या कारवाईमध्ये दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. डोनर देत असलेल्या स्पर्मची ही कंपनी साठवणूक करत त्यांचा अवैधरित्या व्यापार करत असल्याची माहिती वसई- विरार महापालिकेला मिळाली. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने त्या अनुषंगाने कारवाई करत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी आणि आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी तपासणीसाठी वैद्यकीय तपास तयार करत त्यांना घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले.
advertisement
वसई- विरार महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे 9 मार्च रोजी पद्मीबाई टॉवरमधील जीवदानी सायंटिफिक कंपनीला अचानक भेट देत तपासणी केली. तपासणी दरम्यान ही कंपनी आणि संबंधित एजन्सीचे मालकी हक्क मयूर भागवत संखे आणि कमलेश शंकर खुत यांच्याकडे असल्याचे समोर आले. बेकायदेशीर पद्धतीने हा धंदा सुरू असल्यामुळे महापालिकेने कारवाईचा बडगा उचलला आहे. स्पर्म डोनर बँकेची सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान अधिनियम 2021 च्या अंतर्गत एआरटी बँक म्हणून नोंदणी केलेली नव्हती. सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान अधिनियम 2021 या कायद्याप्रमाणे, कोणत्याही नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायाची शैक्षणिक पात्रता नसतानाही एजन्सी अवैधरित्या शुक्राणू साठवणूक करून व्यापार करत असल्याचे आढळले.
Location :
Vasai-Virar City,Thane,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 5:42 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Virar News: डॉक्टर नाही, पदवी नाही, तरीही चालवत होते 'स्पर्म बँक'! विरारमधील पद्मीबाई टॉवरमधील काळेधंदे उघड






