Banana : पिवळाधमक रंग बघून केळं विकत घेताय? थांबा! असं ओळखा नैसर्गिक आणि केमिकलने पिकवलेलं फळ, नाहीतर आरोग्यासोबत होईल खेळ
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ऊर्जेचा पॉवरहाऊस मानलं जाणारं हे फळ आपण अगदी विश्वासाने रोजच्या आहारात घेतो. पण, कधी विचार केलाय का की, बाजारात एका रांगेत लावलेली ती अतिशय सुंदर, डाग विरहित आणि पिवळीधमक केळी नैसर्गिकरित्या पिकलेली असतात का?
लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचंच आवडतं आणि खिशाला परवडणारं फळ म्हणजे केळं. हे फळ कोणत्याही सिजनला, सहज उपलब्ध असतं, प्रत्येक नाक्यावर आपल्याला कोणतं फळ मिळो ना मिळो केळं तर नक्कीच मिळतं. ऊर्जेचा पॉवरहाऊस मानलं जाणारं हे फळ आपण अगदी विश्वासाने रोजच्या आहारात घेतो. पण, कधी विचार केलाय का की, बाजारात एका रांगेत लावलेली ती अतिशय सुंदर, डाग विरहित आणि पिवळीधमक केळी नैसर्गिकरित्या पिकलेली असतात का?
advertisement
सत्य थोडं कडवट आहे. केळी कच्ची तोडून लांबच्या प्रवासासाठी पाठवली जातात आणि व्यापारी त्यांना लवकर पिवळं करण्यासाठी कृत्रिम पद्धतींचा वापर करतात. पण, रसायनांचा हा मारा केवळ केळ्याची चवच बिघडवत नाही, तर तुमच्या पचनसंस्थेसाठीही तो धोक्याची घंटा ठरू शकतो. 'कॅल्शियम कार्बाइड'सारखी घातक रसायने वापरून पिकवलेली केळी कशी ओळखायची, हे जाणून घेणं आता काळाची गरज बनली आहे.
advertisement
1. रंगाचा 'भुलभुलैया' ओळखाकेमिकलने पिकवलेलं केळं ओळखण्याची पहिली पायरी म्हणजे त्याचा रंग. नैसर्गिकरित्या पिकलेलं केळं कधीही एकसारखे पिवळे नसते. त्यावर छोटे छोटे तपकिरी रंगाचे ठिपके असतात, जे केळं गोड झाल्याची निशाणी आहेत. याउलट, रसायनांनी पिकवलेलं केळं प्लॅस्टिकसारखं चकाकणारं आणि निऑन पिवळ्या रंगाचं दिसतं. जर केळ्यावर एकही डाग नसेल आणि ते अतिशय 'परफेक्ट' दिसत असेल, तर सावध व्हा.
advertisement
2. देठाचा रंग बरंच काही सांगतोकेळ्याच्या देठाकडे लक्ष देणं ही एक स्मार्ट ट्रिक आहे. निसर्गतः पिकलेल्या केळ्याचा देठाचा भाग थोडा सुकलेला आणि सुरकुत्या पडलेला असतो. पण केमिकलने पिकवलेल्या केळ्याचं शरीर तर पिवळं असतं, मात्र त्याचं देठ चटक हिरवं असतं. याचं कारण असं की, रसायनांनी केवळ सालीचा रंग बदललेला असतो, पण फळ आतून अजूनही कच्चं असतं. हा विसंगत रंग भेसळीची पक्की खुणा आहे.
advertisement
3. सुगंधावरून करा खात्रीखऱ्या अर्थाने पिकलेल्या केळ्याला एक अतिशय गोड आणि मनमोहक सुगंध असतो. स्टार्चचं साखरेत रूपांतर झाल्यामुळे हा सुगंध येतो. मात्र, केमिकलवाल्या केळ्यांना एकतर वासाच नसतो किंवा त्यांना गवत आणि रसायनांसारखा विचित्र दुर्गंध येतो. खरेदी करण्यापूर्वी देठाजवळ वास घेऊन बघणे हा एक सोपा उपाय आहे.
advertisement
4. आतील बनावट आणि चवकेळं मधून तोडून पाहिल्यास फरक स्पष्ट दिसतो. नैसर्गिक केळं आतून मलाईदार (Creamy), मऊ आणि किंचित ओलसर असतं. याउलट, औषध लावलेलं केळं आतून कोरडं, कडक किंवा रबरसारखं वाटू शकतं. रसायनांमुळे त्यातील स्टार्चचं नैसर्गिक साखरेत रूपांतर होत नाही, त्यामुळे ही केळी खाताना चवीलाही बेचव लागतात.
advertisement
advertisement








