advertisement

Pune: सगळे साखर झोपेत होते अन् परिसरात बेछुटपणे गोळीबार, पुण्यातील घटनेमुळे खळबळ

Last Updated:

पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीनं जमिनीच्या कारणावरून गोळ्या झाडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

News18
News18
सुमित सोनवणे, प्रतिनिधी
पुणे: पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये काही केल्या कमी होत नाही. मारामारी, खून आणि खंडणी अशा घटना वारंवार घडत आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव पोलीस स्टेशनच्या परिसरात गोळीबाराची घटना घडली. जमिनीच्या वादातून ही घटना घडली होती, अखेरीस १२ तासांच्या आतमध्ये एका आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन परिसरात शनिवारी पहाटे गोळीबाराची थरारक घटना घडली होती. केडगाव स्टेशन परिसरातील एका गृहनिर्माण संस्थेच्या शेजारी हा गोळीबार झाला. जमिनीच्या व्यवहारातून दोन गटामध्ये वाद झाला होता. या वादातून  एका जणाने हवेत गोळीबार केला होता.
advertisement
पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीनं जमिनीच्या कारणावरून गोळ्या झाडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पहाटेच्या शांततेत गोळीबाराचा आवाज आल्याने स्थानिक नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली असता पिस्तुलीतून गोळीबार केलेल्या गोळीची पुंगळी सापडली.
१२ तासांमध्ये आरोपीला बेड्या
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि इतर माहिती गोळा केली. या प्रकरणी अखेरीस १२ तासांमध्ये एका गुन्हेगार  तरुणाला अटक करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून दोन गटामध्ये वाद झाला होता. या वादातून गोळीबाराची घटना घडली होती. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मात्र, या दोन गटामध्ये जमिनीवरून नेमकाा काय वाद होता, याची तपशील अद्याप समोर आली नाही.
advertisement
मात्र,  जमिनीच्या वादातून झालेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरलं  आहे. यवत पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune: सगळे साखर झोपेत होते अन् परिसरात बेछुटपणे गोळीबार, पुण्यातील घटनेमुळे खळबळ
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement