TRENDING:

Lungs Cancer : खोकला जास्त काळ टिकला तर दुर्लक्ष नको, असू शकतं फुफ्फुसाच्या कर्करोगाचं लक्षण

Last Updated:

फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं सामान्य श्वसन समस्यांसारखीच असतात, ज्यामुळे त्याचं निदान उशिरा होतं. सतत खोकला, थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास होणं यासारख्या लक्षणांसाठी त्वरित चाचणी आवश्यक असते. मधुमेह आणि थायरॉईड आजार हे आजकाल सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहेत. दर दहापैकी सात जणांना या आजारांचा त्रास होतो आणि अनेकांना हे माहित नसतं की त्यांना हा आजार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : साधा खोकला आहे म्हणून दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. आयुष मंत्रालयाच्या मते, हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचं सुरुवातीचं लक्षण देखील असू शकतं.
News18
News18
advertisement

फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं सामान्य श्वसन समस्यांसारखीच असतात, ज्यामुळे त्याचं निदान उशिरा होतं. सतत खोकला, थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास होणं यासारख्या लक्षणांसाठी त्वरित चाचणी आवश्यक असते. मधुमेह आणि थायरॉईड आजार हे आजकाल सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहेत. दर दहापैकी सात जणांना या आजारांचा त्रास होतो आणि अनेकांना हे माहित नसतं की त्यांना हा आजार आहे.

advertisement

Heart Care : मधुमेह, बीपी नसतानाही हार्ट अटॅक का येतो ? जाणून घ्या कारणं

या आजारांनंतर, देशभरात फुफ्फुसांच्या कर्करोगाचं प्रमाणही झपाट्यानं वाढतंय. आयसीएमआरच्या अहवालानुसार, 2025 मधे पुरुषांमधे फुफ्फुसांच्या कर्करोगाचे 81,219 नवीन रुग्ण आणि महिलांमध्ये 30, 109रुग्ण आढळले.

आयुष मंत्रालयानं अलीकडेच फुफ्फुसांच्या कर्करोगाची लक्षणं आणि उपचारांवर प्रकाश टाकणारी एक पोस्ट शेअर केली आहे. मंत्रालयाच्या मते, सौम्य खोकला किंवा सामान्य श्वसन समस्या देखील कधीकधी कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात.

advertisement

सततचा खोकला, थकवा, श्वास घेण्यास त्रास होणं, छातीत दुखणं किंवा वजन अचानक कमी होणं यासारख्या लक्षणांपासून लोकांनी सावध होणं गरजेचं आहे.

फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचं एकमेव कारण धूम्रपान नाही हे देखील आयुष मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. फुफ्फुसांचा कर्करोग केवळ तंबाखू आणि धूम्रपानामुळे होत नाही. दुसरं कोणी धू्म्रपान करताना होणारा धूर, वायू प्रदूषण आणि रसायनं किंवा एस्बेस्टोस असलेल्या उद्योगांमधे काम केल्यानंही या आजाराचा धोका वाढू शकतो.

advertisement

Pitta Dosha : सतत चिडचीड होते, राग येतोय ? आयुर्वेदात सांगितलंय याचं उत्तर

लक्षणं वेळेत ओळखली आणि उपचार सुरू केले तर अनेकांचे जीव वाचू शकतात. सामान्यतः, फुफ्फुसांच्या पेशी नवीन पेशी तयार करण्यासाठी विभाजित होतात, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तथापि, कधीकधी या पेशी अनियमितपणे वाढतात आणि ट्यूमर तयार करतात, ज्यामुळे अवयव योग्यरित्या कार्य करू शकत नाही.

advertisement

फुफ्फुसांच्या कर्करोगाचे दोन मुख्य प्रकार आहेत: नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर आणि स्मॉल सेल लंग कॅन्सर. भारतात नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सरचं प्रमाण अधिक आहे आणि लवकर निदान झालं तर तो बरा होऊ शकतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ज्वेलरी फक्त 100 रुपयांपासून, लग्नात सगळे पाहतच राहतील, इथं करा खरेदी!
सर्व पहा

तर, स्मॉल सेल लंग कॅन्सर, शरीरात वेगानं पसरतो आणि तो अधिक धोकादायक मानला जातो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Lungs Cancer : खोकला जास्त काळ टिकला तर दुर्लक्ष नको, असू शकतं फुफ्फुसाच्या कर्करोगाचं लक्षण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल