ठाण्याच्या गावदेवी मार्केटमध्ये निधी कलेक्शन या दुकानात हे ड्रेस मिळत आहेत. या ठिकाणी फॅशनेबल कुर्ती, आलिया कट आणि नायरा कट अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहे. त्याच बरोबर सध्या ट्रेंडमध्ये असणारी डिज़ाइनर बेल्टची लॉंग कुर्ती, त्याचबरोबर अनारकली सारख्या कुर्ती प्रमाणे फॅशनमध्ये ट्रेडिंग असणारा ऑर्गेनजा दुपट्टावाला कुर्ती सेट अगदी स्वस्त किमतीत मिळत आहे.
advertisement
फक्त 35 रुपयांमध्ये करा साडी खरेदी, ठाण्यात कुठे आहे हे मार्केट? PHOTOS
कोणते प्रकार उपलब्ध ?
सध्या एथनिक वेअरचे महिलांमध्ये वेगळेच फ्याड पाहायला मिळत आहे. या एथनिक प्रकारात आता फॅन्सी बेल्ट असलेले लॉंग कुर्ती सध्या ट्रेंडमध्ये आहेत. हे लॉंग कुर्ती साडीचा कपड्यातून तयार केलेले असतात. सुंदर पॅटर्नचे हे लॉंग कुर्ती महिलांच्या अत्यंत आवडीचे बनले आहेत. चिकनकारी, लखनवी, फॉर्मल, स्ट्रेट कुर्ती यामध्ये उपलब्ध आहेत. या अनेक प्रकारच्या कुर्ती खरेदी करण्यासाठी मुंबईचा अनेक भागातून महिला या ठिकाणी येतात.
तुम्हाला ही सेलिब्रिटी सारखं दिसायचं का? पुण्यात ‘या’ ठिकाणी करा कपड्यांची खरेदी Video
किती आहे किंमत?
साडीच्या कपड्यांपासून बनलेली ही लाँग कुर्ती साडेआठशे या किमतीत अनेक साइज रेंजमध्ये मिळतील. त्याचबरोबर आलिया कट आणि नायरा कट या फेमस कुर्ती फक्त 400 ते 500 रुपयांपासून या ठिकाणी मिळतात. चिकन करी आणि लखनवी कुर्ती भरपूर कलर व्हरायटीमध्ये या ठिकाणी फक्त 400 रुपयात मिळतात. या ठिकाणी विविध प्रकारच्या कुर्ती स्वस्त दरात उपलब्ध आहेत, अशी माहिती येथील मालक सनी कुमार निर्मल यांनी दिली आहे.