advertisement

आपल्याला गुदगुल्या का होतात? त्यावेळी आपण न कळत का हसतो? यामागचं लॉजिक तुम्हाला आश्चर्यचकीत करेल

Last Updated:

कधी विचार केलाय का की, कुणीतरी आपल्याला स्पर्श केल्यावर आपल्याला हसू का येतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपण स्वतःला गुदगुल्या केल्या तर त्या का होत नाहीत? यामागे विज्ञानाचं एक असं गुपित दडलंय जे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : कल्पना करा, तुम्ही शांत बसला आहात आणि अचानक कुणीतरी तुमच्या काखेखाली किंवा तळपायाला हात लावला... बस! पुढच्याच क्षणी तुमची अवस्था काय होते? तुम्ही वेड्यासारखे हसायला लागता, हात-पाय मारता आणि समोरच्याला थांबवायला विनवण्या करता. पण कधी विचार केलाय का की, कुणीतरी आपल्याला स्पर्श केल्यावर आपल्याला हसू का येतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपण स्वतःला गुदगुल्या केल्या तर त्या का होत नाहीत? यामागे विज्ञानाचं एक असं गुपित दडलंय जे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
1. दोन प्रकारच्या गुदगुल्या: तुम्हाला कोणती माहितीये?
विज्ञानाच्या भाषेत गुदगुल्यांचे दोन प्रकार असतात, जे ऐकून तुम्हाला थोडा धक्काच बसेल.
निसमेसिस (Knismesis) : हा प्रकार म्हणजे अंगावर मुंगी चालल्यासारखं वाटणं किंवा पिसाने खाजवणं. यात हसू येत नाही, पण एक प्रकारची अस्वस्थता येते. हे प्राण्यांमध्येही असतं, त्यांना देखील ते जाणवतं.
गार्गालेक्सिस (Gargalesis) : हा तो प्रकार आहे ज्यात आपण 'फिल्मी' स्टाईलने हसतो. बरगड्या, काख किंवा पोटावर कुणीतरी जोरात गुदगुल्या केल्या की जे होतं, त्याला गार्गालेक्सिस म्हणतात. हे फक्त माणसं आणि काही ठराविक माकडांमध्येच पाहायला मिळतं.
advertisement
2. हे हसू आनंदाचं नसतं, तर 'भीतीचं' असतं.
आपल्याला वाटतं की आपल्याला मजा येतेय म्हणून आपण हसतोय, पण विज्ञानानुसार हे हसू म्हणजे एक 'डिफेन्स मेकॅनिझम' (स्वतःचा बचाव करण्याची पद्धत) आहे. जेव्हा कुणीतरी अचानक आपल्या शरीराच्या नाजूक भागाला स्पर्श करतं, तेव्हा मेंदूच्या 'सोमॅटोसेन्सरी कॉर्टेक्स' (Somatosensory Cortex) भागाला सिग्नल मिळतो. हा भाग स्पर्शाची जाणीव करून देतो. पण त्याच वेळी मेंदूचा 'एन्टीरियर सिंग्युलेट कॉर्टेक्स' हा भाग सक्रिय होतो जो धोक्याची जाणीव करून देतो. म्हणजे थोडक्यात, आपल्या मेंदूला वाटतं की आपल्यावर कुणीतरी हल्ला केलाय. त्या धक्क्यातून (Shock) शरीर जी प्रतिक्रिया देतं, ती हसण्याच्या स्वरूपात बाहेर पडते.
advertisement
3. स्वतःला गुदगुल्या का होत नाहीत?
हा प्रश्न लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पडतो. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी स्वतःच्या हाताने स्वतःला हसवू शकत नाही. याचं कारण आहे आपल्या मेंदूचा 'सेरिबेलम' (Cerebellum) हा भाग.
जेव्हा तुम्ही स्वतःला स्पर्श करायला जाता, तेव्हा तुमच्या मेंदूला आधीच माहिती असतं की हा स्पर्श तुम्हीच करणार आहात. मेंदू त्या सिग्नलला 'कॅन्सल' करतो. मेंदूला माहिती असतं की यात कोणताही 'सरप्राईज' फॅक्टर किंवा 'धोका' नाहीये. त्यामुळे मेंदू त्या स्पर्शाकडे दुर्लक्ष करतो. जर आपल्याला स्वतःला गुदगुल्या झाल्या असत्या, तर आपण स्वतःचे पाय धुताना किंवा कपडे घालताना सुद्धा वेड्यासारखे हसत राहिलो असतो.
advertisement
4. शरीराचे 'हे' भागच का टार्गेट होतात?
काख, तळपाय, पोट किंवा गळा याच ठिकाणी गुदगुल्या का होतात? कारण हे भाग आपल्या शरीराचे सर्वात नाजूक भाग आहेत. इथे रक्तवाहिन्या आणि नसा त्वचेच्या अगदी जवळ असतात. प्राचीन काळी शत्रूशी लढताना हे भाग वाचवणं गरजेचं होतं. त्यामुळे निसर्गाने या भागांना अतिसंवेदनशील बनवलं आहे, जेणेकरून थोडा जरी स्पर्श झाला तरी आपण लगेच सावध होऊ.
advertisement
5. बोनस फॅक्ट: गुदगुल्या करणं हा छळाचा प्रकार होता.
इतिहास उघडला तर असं दिसून येतं की, प्राचीन काळी शत्रूकडून माहिती कढवण्यासाठी 'गुदगुल्या' हे एक अस्त्र म्हणून वापरलं जायचं. याला 'Tickle Torture' म्हणतात. सततच्या गुदगुल्यांनी श्वास कोंडतो आणि माणूस हसून हसून बेजार होतो. त्यामुळे पुढच्या वेळी कुणाला गुदगुल्या करताना विचार करा, तुम्ही त्यांना हसवत नाहीये, तर त्यांचा 'छोटा छळ' करत आहात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
आपल्याला गुदगुल्या का होतात? त्यावेळी आपण न कळत का हसतो? यामागचं लॉजिक तुम्हाला आश्चर्यचकीत करेल
Next Article
advertisement
Ola, Uber, Rapidoचा उद्या संप; बाईक टॅक्सीपासून कॅबपर्यंत सगळं ठप्प! ‘ऑल इंडिया ब्रेकडाऊन’ आंदोलन,सरकारला दिला अल्टिमेटम
Ola, Uber, Rapidoचा उद्या संप; बाईक टॅक्सीपासून कॅबपर्यंत सगळं ठप्प!
  • उद्या देशव्यापी संप

  • ओला, उबर, रॅपिडोचा 'ऑल इंडिया ब्रेकडाऊन'

  • ओला-उबर चालकांचा गडकरींना 'अल्टिमेटम'

View All
advertisement