दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाची महिला रविशा चिनप्पाने काही दिवसांपूर्वी तिचा प्रसुतीनंतर वजन कमी करण्याचा प्रवास इंस्टाग्राम पेज 'IVF Momma' वर शेअर केला आहे. रविशाने सांगितले की तिने तिच्या दिनचर्येत केवळ तीन बदल करून ३४ दिवसांमध्ये तब्बल ८ किलो वजन कमी केले आहे.
रविशाने सांगितले की प्रसुतीनंतर जवळपास वर्षभर तिचे वाढलेले वजन कमी होत नव्हते. मात्र तिने तिच्या दिनचर्येत फक्त तीन गोष्टींचा समावेश करून तिने ८ किलो वजन कमी केले. या तीन गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
advertisement
हायड्रेटेड राहणे
रविशाने सांगितले की ती तिच्या व्यस्त दिनचर्येमुळे पाणी प्यायला विसरायची. जेव्हा तिने नियमित पाणी प्यायला सुरुवात केली, तेव्हा तिला जाणवले की हायड्रेशन वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तिने एक अलार्म सेट केला होता, जो प्रत्येक ९० मिनिटांनी वाजत असे. अलार्म वाजताच ती २० घोट पाणी प्यायची.
आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढवणे
आहारातील प्रोटीनचे प्रमाण वाढवल्याने रविशाची गोड आणि चटपटीत स्नॅक्स खाण्याची लालसा कमी झाली. तिने तिच्या आहारात दररोज १०० ग्रॅम प्रोटीनचा समावेश केला. यामुळे तिचे वजन वेगाने नियंत्रणात आले. इतकंच नाही, तर तिच्या शरीराला आवश्यक पोषकतत्वेही मिळू लागली.
योग्य मानसिकता आणि व्हिज्युअलायझेशन
वजन कमी करण्यात मानसिकता मोठी भूमिका बजावते. रविशाने तिचे आदर्श वजन साध्य करण्यासाठी स्वतःला सकारात्मकरित्या प्रेरित केले आणि मिळणाऱ्या चांगल्या परिणामांची कल्पना केली.
