या पदार्थांमध्ये दडलंय चेहऱ्याचं सौंदर्य
या यादीतील पहिला पदार्थ ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. हा पदार्थ आहे लाल मिरची. वोग इंडियाच्या रिपोर्टनुसार, लाल मिरची व्हिटॅमिन सीने भरपूर आहे. 100 ग्रॅम लाल मिरचीमध्ये 229 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असतं. यासोबतच यामध्ये व्हिटॅमिन ए आणि रेटिनॉल देखील असतं जे तुमचं वय चेहऱ्यावर दिसण्यापासून रोखतं. त्यामुळे रोज कोणत्यातरी माध्यमातून थोडी मिरची खाणं चांगलं असतं.
advertisement
Monsoon Diet Tips: पावसाळ्यात अजिबात करू नका 'हे' काम; नाहीतर गाठावा लागेल दवाखाना
पेरू - 100 ग्रॅम पेरूमध्ये 228 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असतं. यासोबतच त्यात पॉलीफेनॉल, कॅरोटीनॉइड्स आणि इतर अनेक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात जे त्वचा सुधारण्यास मदत करतात.
शिमला मिरची - लाल आणि पिवळी शिमला मिरची त्वचेवर चमक आणण्यासाठी खूप उपयुक्त आहे. 100 ग्रॅम सिमला मिरचीमध्ये 166 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असतं.
संत्री प्रत्येकजण खातात, परंतु जर तुम्ही ती नियमितपणे खाल्ली तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक तर येतेच पण त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. एका संत्र्यामध्ये 75 मिलीग्राम पर्यंत व्हिटॅमिन सी असते. पण संत्र्याचा रस काढल्यानंतर लगेच प्या.
ब्रोकोली- ब्रोकोली हे व्हिटॅमिन सीचं पॉवरहाऊस आहे. एकूणच आरोग्यासाठी ब्रोकोली ही अतिशय उपयुक्त भाजी आहे. फक्त 28 ग्रॅम ब्रोकोलीमध्ये तब्बल 89 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असतं.
स्ट्रॉबेरी - स्ट्रॉबेरी हा व्हिटॅमिन सीचा खजिना आहे. आठवड्यातून चार-पाच दिवस सुद्धा चार-पाच स्ट्रॉबेरी खाल्ल्यास चेहऱ्यावरची चमक कायम राहते.