देहरादून, 15 डिसेंबर : उन्हाळा संपून सुरू झालेल्या पावसाळ्यात वातावरणात दमटपणा येतो. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप असे विविध संसर्गजन्य आजार होतात. तसंच पावसाळा संपून सुरू झालेल्या हिवाळ्यातदेखील घरात एकातरी व्यक्तीला सर्दी, खोकला अशी परिस्थिती असते. या संसर्गजन्य आजारांमुळे शरिरातलं डी जीवनसत्त्व म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी अंगात सतत अशक्तपणा असल्याने काहीच काम करावंसं वाटत नाही. घराबाहेरही पडू नये असं वाटण्याइतका आळस येतो. यावर उपाय काय? तर, सकस आहार घेणे.
advertisement
हिवाळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात ड्रायफ्रूट्स आणि मासे खाण्याचा सल्ला दिला जातो. उत्तराखंडची राजधानी असलेल्या देहरादूनमधील दून रुग्णालयातील आहारतज्ज्ञ डॉ. ऋचा कुकरेती सांगतात की, वातावरणातील बदल आपल्या शरिराला सहजपणे सहन होत नाही. त्यामुळे विविध आजार जडतात. ताप, सर्दी, खोकल्यासह घसादुखीदेखील जाणवते. अंगदुखी, सांधेदुखी होते, शिवाय शरिरावर खाजही येते. हे आजार लगेच बरे होण्यासारखेच असतात. परंतु उपचारांपेक्षा प्रतिबंध कधीही बरा. त्यामुळे या आजारांना शरिरापासून दूर ठेवण्यासाठी आहारात जीवनसत्त्व आणि पौष्टिक तत्त्वांनी परिपूर्ण अशा पदार्थांचा समावेश करावा. ज्यामुळे केवळ आजार दूर राहत नाहीत, तर शरिराला ऊर्जादेखील मिळते.
थंडीत खा 'हे' 5 पदार्थ, शरीर राहील उबदार; आजारांपासून होईल संरक्षण
डॉक्टरांनी सांगितलं की, हिवाळ्यात तेलकट पदार्थ खाणं धोकादायक असतं. शिवाय चहा, कॉफीदेखील जास्त प्रमाणात घेऊ नये. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जास्तीत जास्त ड्रायफ्रूट्स खावे. त्यातलं तेल हृदय आणि यकृतासाठी चांगलं असतं. तसंच जेवणात फायबरयुक्त पदार्थ असतील याची काळजी घ्यावी, ज्यामुळे शरिराचं तापमान सामान्य राहतं.
चेहऱ्यावर तेज देणारी हळद रोखू शकते हार्ट अटॅकपण! वाचा न ऐकलेले फायदे
थंडीत शरिरात सी जीवनसत्त्व जाणं अत्यंत आवश्यक असतं. त्यासाठी संत्र, मोसंबी, आवळा, इत्यादी आंबट फळं खावी. त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या आणि हंगामी भाज्यांचा आहारात समावेश करावा. तर, शेंगदाणे, डेअरी प्रॉडक्ट्स, सीड्स, ताक, कडधान्य, मसूर डाळ, बदाम, इत्यादींमुळे शरिराला कॅल्शियम मिळतं आणि हाडं मजबूत होतात, असं डॉक्टर म्हणाल्या.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g