एरवीही सकाळची सुरुवात योग्य पद्धतीनं केल्यानं दिवस निरोगी आणि उत्साही होऊ शकतो. आपली पचनसंस्था आपल्या आरोग्याचा केंद्रबिंदू असते. पण खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकदा गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्या उद्भवतात. याचा परिणाम एकूण आरोग्यावर होऊ शकतो.
निरोगी पचनासाठी, सकाळी उठल्याबरोबर काही पेयं पिणं तुमच्या पचनासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. जाणून घेऊया पाच निरोगी सकाळच्या पेयांबद्दल.
advertisement
कोमट लिंबू पाणी - सकाळी उठून सर्वात आधी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून पिणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जाते. या पेयामुळे यकृत विषमुक्त करण्यास मदत होते आणि पाचक एंजाइम्सच्या स्रावाला यामुळे प्रोत्साहन मिळतं. लिंबातील सायट्रिक आम्ल विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि आतडी स्वच्छ करण्यास मदत करते. यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते, बद्धकोष्ठता कमी होते आणि शरीर हायड्रेटेड राहतं. यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं, हे जीवनसत्त्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
Face Pack : राईस फेसपॅकचे तीन पर्याय आणतील चेहऱ्यावर ग्लो, नक्की वापरुन बघा
ओव्याचं पाणी - ओवा पचनाच्या समस्यांवरचा एक नैसर्गिक उपाय आहे. एक ग्लास पाण्यात रात्रभर एक चमचा ओवा भिजत ठेवा. ते पाणी गाळून सकाळी प्या. ओव्यामुळे पाचक रसांच्या स्रावाला मदत मिळते. गॅस, आम्लता, अपचन आणि पोटदुखीपासून यामुळे आराम मिळतो. चयापचय वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी हे पेय प्रभावी आहे.
कोरफडीचा रस - ताज्या कोरफडीचा गर पाण्यात मिसळून बनवलेला रस पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरफडीत दाहक-विरोधी गुणधर्म असतात, यामुळे आतड्यांतील जळजळ कमी होते. यामुळे शरीर आतून स्वच्छ होतं, बद्धकोष्ठता दूर होते, कोरफडीच्या रसामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं आणि पोटातील अल्सर आणि अॅसिड रिफ्लेक्ससाठी देखील हे पेय फायदेशीर आहे.
Diwali : फटाके उडवताना काळजी घ्या, धूर, उष्णतेमुळे त्वचेवर जाणवतात परिणाम
बडीशेप पाणी - बडीशेपेचं पाणी पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतं. रात्रभर एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप भिजवा. सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि प्या. बडीशेपेत अँटी-स्पास्मोडिक गुणधर्म असतात, ज्यामुळे पोटातील पेटके आणि पोटफुगी कमी होते. यामुळे भूक वाढवण्यास आणि गॅस आणि आम्लता कमी करण्यास मदत होते.
दही लस्सी किंवा ताक - दही किंवा ताकात पोटासाठी खूप फायदेशीर असलेले प्रोबायोटिक्स असतात. सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा नंतर एक ग्लास ताजं, मसाला नसलेलं ताक किंवा पातळ लस्सी पिणं फायदेशीर आहे.
दह्यातील चांगले बॅक्टेरिया आतड्यांचं आरोग्य सुधारतात, अन्न पचन करण्यास मदत करतात आणि हानिकारक बॅक्टेरियांशी लढतात. या पेयामुळे पोटाला आराम मिळतो आणि पचनाच्या समस्या दूर होतात.